TRENDING:

मॅग्झिनमधल्या फोटोने नशीबला कलाटणी, रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री; 'ती' सध्या काय करते?

Last Updated:
2000 च्या सुरुवातीला उदिता गोस्वामी ही बॉलिवूडमध्ये तिने आपल्या अभिनयातून आणि वेगवेगळ्या चित्रपटांतून आपल्या नावाची ओळख बनवत गेली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून नशीब आजमावले, पण तिला यश मिळाले नाही. शेवटी, तिने अभिनयातून निवृत्ती घेतली.
advertisement
1/8
मॅग्झिनमधल्या फोटोने नशीबला कलाटणी, रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्रीने सोडली इंड
2000 च्या सुरुवातीला उदिता गोस्वामी ही बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्ड इमेज, ग्लॅमरस, स्क्रिन प्रेझेंस आणि वेगवेगळ्या चित्रपटांतून आपल्या नावाची ओळख बनवत गेली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून नशीब आजमावले, पण तिला यश मिळाले नाही. शेवटी, तिने अभिनयातून निवृत्ती घेतली.
advertisement
2/8
उदिता गोस्वामी मॉडेलिंग इंडस्ट्रीतून चित्रपटांकडे वळली. तिच्या उंचीने आणि आत्मविश्वासपूर्ण वागण्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. 2001 मध्ये आलेल्या "पाप" या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
advertisement
3/8
त्या चित्रपटामुळे उदिता रातोरात प्रसिद्धी झोतात आली. त्यानंतर तिने "धूप", "झेहर", "अक्सर" आणि "अगली और पगली" सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. विशेषतः इमरान हाश्मीसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीमुळे तिला त्यावेळी बरीच प्रसिद्धी दिली.
advertisement
4/8
उदिता गोस्वामी त्या काळात बोल्ड भूमिकांसाठी विशेष प्रसिद्धीझोतात आली होती. तिची ओळख त्याचसाठी बनली होती. "झेहर" आणि "अक्सर" सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आणि गाणी त्या काळातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या. इमरान हाश्मीसोबतची तिची जबरदस्त केमिस्ट्री सर्वत्र गाजली.
advertisement
5/8
बोल्ड सीन्समुळे उदिताला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली, पण ती त्यासाठीच अडचणीचे कारणही ठरली. ती अशाच प्रकारच्या भूमिकांमध्ये टाइपकास्ट होती. चित्रपट निर्माते तिला फक्त हॉट सीन्समध्येच कास्ट करायचे.
advertisement
6/8
सलग काही चित्रपटांनंतर, उदिताच्या करियरची ग्रोथ हळूहळू मंदावली. तिला चांगल्या चित्रपटांमध्ये काम मिळणंही बंद झालं. तिने काही मोजकेच प्रोजेक्ट्स हाती घेतले, परंतु तिच्याकडून अपेक्षित असलेला स्टारडम ती राखू शकली नाही. यानंतर, उदिताने हळूहळू स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि प्रसिद्धीपासून पूर्णपणे गायब झाली.
advertisement
7/8
उदिता गोस्वामीचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे. वर्षानुवर्षे ती चित्रपट निर्माते मोहित सुरीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांची प्रेमकहाणी इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रसिद्ध होती. बराच काळ डेटिंग केल्यानंतर, उदिता आणि मोहित सुरी २०१३ मध्ये लग्नबंधनात अडकले.
advertisement
8/8
लग्नानंतर उदिताने अभिनयापासून पूर्णपणे ब्रेक घेतला आणि तिच्या कुटुंबाला प्राधान्य दिले. आज ती दोन मुलांची आई आहे आणि तिच्या कौटुंबिक जीवनात आनंदी दिसते. ही अभिनेत्री आता डीजे (डिस्को जॉकी) म्हणून स्वतःचे नाव कमवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मॅग्झिनमधल्या फोटोने नशीबला कलाटणी, रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री; 'ती' सध्या काय करते?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल