Weather Alert : महाराष्ट्राचं वारं फिरलं, वातावरण बदललं; हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
यामुळे वाढत्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाहुयात मंगळवारी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7

राज्यातील वातावरणात चढउतार पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वातावरणातील गारवा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. यामुळे वाढत्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाहुयात मंगळवारी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबईत सोमवारी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पहायला मिळेल. तर मुंबई शहर आणि उपनगरात तापमान 34 आणि 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी देखील पुण्यामध्ये ढगाळ वातावरण पहायला मिळेल. तर पुण्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान यामुळे गारठा कमी होणार आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्राला थंडीने अक्षरशः गारठले होते. परंतु राज्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात सोमवारी ढगाळ हवामान होते. यामुळे थंडी कमी झाली आहे. परंतु, 25 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा जाणवू शकतो.
advertisement
6/7
विदर्भात देखील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागपूरमध्ये 25 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील सर्वच भागात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. ढगाळ वातावरण तयार झाल्याने गारठा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्राचं वारं फिरलं, वातावरण बदललं; हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट