TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात वार फिरलं, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना आता पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात वार फिरलं,ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता,हवामान खात्याकडून अलर्ट
राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना आता पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली असल्याने राज्यात थंडी काहीशी कमी राहू शकते. पाहुयात 23 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
23 नोव्हेंबर रोजी मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात सकाळी मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सातारा आणि सातारा घाटमाथा परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मुख्यतः निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. किमान तापमानात वाढ झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारवा काहीसा कमी जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातही गारवा काहीसा कमी झाला आहे.
advertisement
7/7
राज्यातील वातावरणाची हीच स्थिती पुढील 3 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात वार फिरलं, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल