TRENDING:

Weather Alert: रेनकोट ठेवून द्या अन् स्वेटर काढा, पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, IMD चं महत्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असली तरी अवकाळी संकट टळणार आहे.
advertisement
1/7
रेनकोट ठेवून द्या अन् स्वेटर काढा, पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, IMD चं अपडेट
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली येऊ लागला आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात बुधवारी 29.7 कमाल आणि 18.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट होऊन कमाल तापमान 29 अंशावर तर किमान तापमान 19 अंशावर राहिल. यावेळी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात बुधवारी ढगाळ आकाश राहिले. यावेळी 28.4 अंश सेल्सिअस कमाल आणि 18. 5 किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी किमान आणि कमाल तापमान 19 ते कमाल 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील किमान तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहिल. तर कमाल तापमान 29 अंशावर राहिल. यावेळी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानात घट होवून पारा 31 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 23 अंशावर राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 30.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. मात्र पावसाची शक्यता असल्याने शेतीच्य कामांनी वेग घेतला आहे. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रावर घोंघावणारं अवकाळी संकट पुढील 24 तासानंतर संपण्याची चिन्हे आहेत. हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाचा जोर ओसरत आहे. किमान आणि कमाल तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहुल लागली आहे. वातावरणात गारवा वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: रेनकोट ठेवून द्या अन् स्वेटर काढा, पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, IMD चं महत्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल