Weather Update : राज्याच्या या भागांमध्ये आज जोरदार पाऊस, हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/7

पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
2/7
याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/7
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
6/7
मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C च्या आसपास असेल.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Update : राज्याच्या या भागांमध्ये आज जोरदार पाऊस, हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा