आजचं हवामान: विजांचा कडकडाट होणार, अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच आता नवं संकट घोंघावत आहे. आज 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
1/7

राज्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर गेला आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 22 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असून आज कमाल तापमान 42 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सियस राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा सर्वाधिक उष्ण जिल्हा राहिला असून पुढील आठवडाभर सोलापुरातील पारा 42 अंशाच्या पुढेच राहिल. आज दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यात ढगाळ आकाशासह सह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढले आहेत. मागील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 38.7 तर किमान तापमान 20 अंशावर राहिले. पुढील 24 तासात पुण्यातील उष्णता कायम राहणार असून पारा 40 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील पारा चांगलाच कडाडला असून मागील 8 दिवसांपासून 41 अंशांवर असलेला साताऱ्यातील उष्मा पुढील 8 दिवस स्थिरावणार आहे. आज साताऱ्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. आकाश निरभ्र राहील.
advertisement
5/7
गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने तापमानात अंशतः घट दिसून आली. कोल्हापूरात कमाल 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तास कोल्हापुरातील तापमान 39 अंश सेल्सिअस राहील. दुपारनंतर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान तयार होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात पुढील 24 तासांत किमान तापमान 39 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. अशातच आता नवं संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपिकांची आणि नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: विजांचा कडकडाट होणार, अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट