ही नागपंचमी साधीसुधी नाही, जुळून येतील 3 योग आणि उजळेल 4 राशींचं नशीब!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरूवात झाली. आता सणवार साजरे होतील. सुरूवात झाली नागपंचमीने. अयोध्येच्या ज्योतिषांनी सांगितलं होतं की, 9 ऑगस्टला सर्वत्र नागपंचमी साजरी होईल. तसंच तब्बल 6 वर्षांनी या दिवशी विविध दुर्मीळ योग जुळून येतील. सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवी योगामुळे यंदाची नागपंचमी खास असेल. विशेष म्हणजे या 3 योगांमुळे नागपंचमीला काही राशींच्या व्यक्तींना अत्यंत खास फळ मिळेल, असंही ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

मेष : नागपंचमीनिमित्त आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडतील. व्यवसाय विस्तारेल, आजारपण दूर होतील, गुंतवणुकीत किंवा इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील.
advertisement
2/5
कर्क : आपल्यासाठी नागपंचमीपासूनचा काळ उत्तम आहे. आपली सर्व कामं मार्गी लागतील, नातेसंबंध सुधारतील, आर्थिक स्थिती भक्कम होईल, परदेशी प्रवास होऊ शकतो, आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील.
advertisement
3/5
सिंह : आपल्यासाठीसुद्धा <a href="https://news18marathi.com/religion/do-not-do-these-works-on-naga-panchami-even-by-mistake-mhij-1227154.html">नागपंचमीपासूनचा काळ</a> सकारात्मक आहे. नोकरीत वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल, मानसिक शांतता मिळेल, कोर्टात वाद सुरू असतील तर ते मिटतील, आपल्याला हक्काचे पैसे मिळतील, दाम्पत्य जीवनात सुख येईल.
advertisement
4/5
कुंभ : आपला व्यवसाय या काळात कमालीचा विस्तारेल. दाम्पत्याला गोड बातमी मिळू शकते, समाजात आपला <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/sun-enters-its-sign-four-signs-will-get-benefits-l18w-mhij-1225610.html">मान-सन्मान वाढेल</a>, वरिष्ठांची साथ मिळेल.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ही नागपंचमी साधीसुधी नाही, जुळून येतील 3 योग आणि उजळेल 4 राशींचं नशीब!