TRENDING:

IND vs NAM : सूर्या भाऊचा गेम झाला, नामिबियाच्या खेळाडूने ट्रॅपमध्ये अडकवला,नेमकं काय घडलं?

Last Updated:
ईशान किशनने भारताची धावसंख्या 100 पार नेली होती.त्यामुळे सूर्याला फार मोठी जोखीम घेण्याची आवश्यकता नव्हती. पण तो जोखीम घ्यायला गेला आणि आऊट होऊन बसला होता.
advertisement
1/7
सूर्या भाऊचा गेम झाला, नामिबियाच्या खेळाडूने ट्रॅपमध्ये अडकवला,नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर नामिबिया विरूद्ध सामन्यात भारताने 209 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे नामिबियासमोर आता 210 धावांचे लक्ष्य असणार आहे.
advertisement
2/7
ईशान किशनच्या 61 धावांच्या अर्धशतकीय आणि हार्दिक पांड्याचे 52 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 209 धावा केल्या होत्या.
advertisement
3/7
या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही.त्यामुळे टीम इंडिया त्यांचा 260 धावांचा सर्वाधिक रेकॉर्ट मोडू शकली नाही.
advertisement
4/7
या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव खूपच विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याला असं वाटलं देखील नसेल अशा वाईट पद्धतीने तो बाद झाला.
advertisement
5/7
खरं तर टीम इंडियाची धावसंख्या 10 व्या ओव्हरला 120 च्या आसपास होती. सूर्या 12 तर तिलक वर्मा 23 धावांवर खेळत होता.त्यामुळे फारशी जोखिम घ्यायची आवश्यकता नव्हती.
advertisement
6/7
पण नामिबियाकडून 11 वी ओव्हर घेऊन आलेल्या बर्नार्ड स्कोल्टझ मैदानात आला होता.या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सूर्या क्रिज सोडून पुढे येऊन मारायला गेला. बॉलर बर्नाडला ही गोष्ट कळताच त्याने चलाखिने बॉल टाकला. सूर्या हा बॉल मारण्यात अपयशी ठरला आणि विकेटकिपरने मागे क्षणाचाही विलंब लावता त्याला स्टम्प आऊट केले.
advertisement
7/7
एकंदरीत बॉलर बर्नार्डने दाखवलेल्या चलाखीने आणि विकेटकिपरच्या तत्परतेमुळे सूर्याची फुकटात विकेट गेली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NAM : सूर्या भाऊचा गेम झाला, नामिबियाच्या खेळाडूने ट्रॅपमध्ये अडकवला,नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल