Shanidev Astrology: 4 राशींच्या व्यक्तींसाठी 40 दिवस अडचणींचे, शनी होणार अस्त आणि करणार त्रस्त?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Shani Asta 2025: ज्योतिषशास्त्र सांगतं की, सर्व ग्रह वेळोवेळी राशीप्रवेश करतात. त्याचा चांगला, वाईट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. सध्या कुंभ राशीत विराजमान असलेला शनी ग्रह येत्या 28 फ्रेब्रुवारीला अस्त होणार आहे. याच अवस्थेत शनीचं राशीपरिर्वतन होईल. अशात 4 राशींच्या व्यक्तींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असं प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/9

मेष : या राशीवर शनी अस्त होण्याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 40 दिवस मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/9
मेष : आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्यवहाराबाबत कोणताही निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावा. नवं काम सुरू करण्यासाठीदेखील हा काळ अनुकूल नसेल.
advertisement
3/9
वृषभ : शनी अस्त होण्याचा नकारात्मक प्रभाव या राशीवर पडणार आहे. उत्पन्न कमी होऊ शकतं, अनावश्यक खर्च वाढू शकतो.
advertisement
4/9
वृषभ : नोकरीत अडचणी येऊ शकतात. तब्बल 40 दिवस ही परिस्थिती असेल, त्यानंतर काही बदल पाहायला मिळतील.
advertisement
5/9
कुंभ : ही शनीचीच रास मानली जाते, तरीही या राशीच्या व्यक्तींवरदेखील शनीच्या अस्ताचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतात, आर्थिक अडचणी ओढावू शकतात.
advertisement
6/9
कुंभ : वैवाहिक जीवनातही अडथळे येऊ शकतात. मनात भ्रम निर्माण होऊ शकतो. शरीरात आळस संचारेल, त्यामुळे कोणतंही काम वेळेवर पूर्ण होणार नाही, याबाबत सतर्क राहावं.
advertisement
7/9
मीन : शनी अस्त होताच सर्वाधिक नकारात्मक प्रभाव याच राशीवर पडणार आहे, असं ज्योतिषांनी सांगितलंय. अस्त अवस्थेतच शनी मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे शनीचा प्रभाव याच राशीवर जास्त पडेल. या राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो, आत्मविश्वास खचेल.
advertisement
8/9
मीन : आपल्या रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवावं. आपण कोणत्याही वादात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच आर्थिक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
9/9
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shanidev Astrology: 4 राशींच्या व्यक्तींसाठी 40 दिवस अडचणींचे, शनी होणार अस्त आणि करणार त्रस्त?