TRENDING:

Somwar Vrat: सोमवारी महादेवाचा उपवास करणाऱ्यांनी या गोष्टी चुकूनही खाऊ नयेत; व्रत नाही होणार सफल

Last Updated:
Avoid thing in Somvar vrat: सनातन धर्मात सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार शिव आणि पार्वतीची पूजा करण्याचा विधी आहे. सोमवारी उपवास करून महादेवाची पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर देवी पार्वतीची पूजा केल्याने आणि सोमवारी महादेवाचा उपवास केल्याने अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होतो. मात्र, काही नियमांचे पालन केले तरच पूजा-व्रताचा लाभ मिळेल. सोमवारी काय खावे आणि काय खाऊ नये, हे महत्त्वाचे आहे. ज्योतिषी डॉ. गौरव दीक्षित यांच्याकडून जाणून घेऊया, सोमवारी उपवास करताना काय खाऊ नये?
advertisement
1/5
सोमवारी महादेवाचा उपवास करणाऱ्यांनी या गोष्टी खाऊ नयेत; व्रत नाही होणार सफल
ज्योतिषांच्या मते, सोमवारच्या उपवासात हिरव्या भाज्या खाणे टाळावे. हिरव्या भाज्यांमध्ये पालक, फ्लॉवर, वांगी आणि पडवळ खाणे टाळावे. असे केल्याने तुमचे व्रत मोडेल आणि तुम्हाला पूजेचा लाभ मिळणार नाही. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
2/5
शिवभक्तांनी सोमवारी मांसाहार करू नये. तामसिक अन्न खाल्ल्याने भगवान शंकर नाराज होतात, असे मानले जाते. तसेच नकारात्मक शक्ती घरात राहू लागतात. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
3/5
सोमवारच्या उपवासात मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मसालेदार अन्न खाल्ल्यानं उपवास मोडतो. असे मानले जाते की, तामसिक अन्नामध्ये मसाल्यांचा समावेश होतो, त्याचे सेवन टाळावे. जर तुम्ही उपवासासाठी स्वयंपाक करत असाल तर रॉक सॉल्ट वापरावे. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
4/5
शिवभक्तांनी सोमवारच्या उपवासात लसूण, कांदा, आले यांचे सेवन टाळावे. उपवासात या गोष्टी पूर्णपणे निषिद्ध आहेत. शास्त्रानुसार, कांदा आणि लसूण यांसारख्या भाज्या उत्कटता, उत्साह आणि अज्ञान वाढवतात, ज्यामुळे आध्यात्मिक मार्गावर चालण्यात अडथळे येतात आणि व्यक्तीच्या चेतनेवर परिणाम होतो. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
5/5
सोमवारच्या उपवासात बेसनापासून बनवलेल्या वस्तू खाणे टाळावे. त्यामुळे या दिवशी बेसनापासून बनवलेले पकोडे किंवा चिला इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. जर तुम्हाला चिला किंवा पकोडे खायचे असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवून खाऊ शकता. (इमेज-कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Somwar Vrat: सोमवारी महादेवाचा उपवास करणाऱ्यांनी या गोष्टी चुकूनही खाऊ नयेत; व्रत नाही होणार सफल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल