सावधान! देव्हाऱ्यातील 5 वस्तू करू शकतात तुम्हाला कर्जबाजारी, हिरावून घेतील सुख-शांती
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात घराचा देव्हारा हे सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हारा योग्य दिशेला आणि योग्य वस्तूंसह असणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
1/7

हिंदू धर्मात घराचा देव्हारा हे सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हारा योग्य दिशेला आणि योग्य वस्तूंसह असणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
2/7
अनेकदा आपण श्रद्धेपोटी किंवा माहिती नसल्यामुळे देव्हाऱ्यात अशा काही वस्तू ठेवतो, ज्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे घरात विनाकारण भांडणे, आर्थिक चणचण आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
advertisement
3/7
तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती: वास्तुशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात कधीही खंडित किंवा तडे गेलेली मूर्ती ठेवू नये. अशा मूर्तींची पूजा केल्याने फळ मिळत नाहीच, उलट घरात नकारात्मकता वाढते. जर एखादी मूर्ती तुटली असेल, तर ती सन्मानाने वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
advertisement
4/7
एकाच देवाच्या अनेक मूर्ती: देव्हाऱ्यात एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. विशेषतः गणपती, विठ्ठल किंवा कुलदेवीचे दोन फोटो समोरासमोर किंवा शेजारी ठेवल्याने घरामध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक नुकसान होऊ शकते, असे मानले जाते.
advertisement
5/7
सुकलेली फुले आणि हार: देवाला अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर ते देव्हाऱ्यातच ठेवणे अत्यंत अशुभ असते. सुकलेली फुले नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. यामुळे घरात दारिद्र्य येते. दररोज सकाळी देवाची पूजा करण्यापूर्वी आदल्या दिवशीची फुले काढून टाकावीत.
advertisement
6/7
फाटलेली धार्मिक पुस्तके: अनेकदा आपण जुनी किंवा फाटलेली धार्मिक पुस्तके देव्हाऱ्यात साठवून ठेवतो. फाटलेली पाने किंवा जुने झालेले ग्रंथ घरामध्ये वास्तू दोष निर्माण करतात. जर पुस्तक वाचण्यायोग्य नसेल, तर ते एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करावे.
advertisement
7/7
पूर्वजांचे फोटो: अनेक लोक आपल्या पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तींचे फोटो देवांच्या फोटोंसोबतच ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, देव्हारा हा केवळ ईश्वरासाठी आहे. पितरांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला स्वतंत्रपणे लावावेत. देवांसोबत पितरांचे फोटो ठेवल्याने पितृदोष निर्माण होऊ शकतो.टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सावधान! देव्हाऱ्यातील 5 वस्तू करू शकतात तुम्हाला कर्जबाजारी, हिरावून घेतील सुख-शांती