TRENDING:

बीटेक, MBA, नंतर अमेरिकेतील 1 कोटी पगाराची नोकरी सोडून निवडला हा मार्ग, या जैन मुनींच्या त्यागाची अनोखी गोष्ट

Last Updated:
त्याग, वैराग्य हा एक अत्यंत कठीण मार्ग मानला गेला आहे. मात्र, ज्याचे मन परिवर्तन झाले असेल, त्यासाठी हा मार्ग अगदी सोपा होऊन जातो. अशीच कहाणी नागपूरच्या शैलेशसोबत घडली आहे. ते संतांच्या सानिध्यात आले. यानंतर त्यांनी वैराग्याचा मार्ग निवडला. सर्व काही सोडून जैन मुनी बनले आणि आज देशातील एक प्रसिद्ध संत आहेत. (अर्पित कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/4
बीटेक, MBA, नंतर अमेरिकेतील 1 कोटी पगाराची नोकरी सोडून निवडला हा मार्ग
नागपुरमध्ये जन्म झालेले निर्यापक मुनि श्री वीर सागर जी महाराज यांच्या बालपणीचे नाव शैलेष उर्फ रिंकू होते. त्यांचा जन्म 31 मे 1973 रोजी बुधवारी नागपूर येथे झाला होता. त्यांना नीलेश, रूपेश आणि धर्मेश असे तीन भाऊ आहेत. तसेच त्यांच्या आई सुषमा देवी गृहिणी आहेत. तर वडिलांचे निधन झाले आहे. 31 जुलै 1996 रोजी गुरू पौर्णिमेला सिद्ध क्षेत्र महुआजी सूरत गुजरात याठिकाणी निर्यापक मुनि श्री वीर सागर जी महाराज यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केले होते. तेव्हा त्यांचे वय 23 वर्ष होते.
advertisement
2/4
आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांचे शिष्य वीर सागर जी महाराज असे संत आहेत, जे आचार्य श्री यांचे सानिध्य मिळाल्यावर अमेरिकेतून प्रति वर्ष 1 कोटी रुपयांची नोकरी सोडून, कुटुंब सोडून आचार्य भगवान यांच्या भक्तीत लीन झाले.
advertisement
3/4
निर्यापक मुनि श्री वीर सागर जी महाराज यांच्या मुनि दीक्षेच्या आधी त्यांचे जवळचे आणि आत्याचे चिरंजीव बडकुल सुभाष चंद्र हे सांगतात की, मुनि वीर सागर जी महाराज यांच्याशी आचार्य श्री यांनी सांगितले होते की, वैराग्य धारण करण्याआधी तुमच्या आई-वडिलांनी जे तुमच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले आहेत, ते आधी त्यांना परत करा. मग यानंतर शैलेश उर्फ रिंकू यांनी रात्रंदिवस मेहनत करुन आपल्या शिक्षणाचा खर्च आपल्या आई वडिलांना परत केला. यानंतर 21 ऑगस्ट 2004 रोजी दयोदय तीर्थ तिलवारा घाट जबलपुर येथे आचार्य भगवान यांनी शैलेष उर्फ रिंकू यांना मुनि दीक्षा देत त्यांचे मुनि श्री वीर सागर असे नामकरण केले.
advertisement
4/4
जैन मुनि वीर सागर जी महाराज यांनी आपले प्राथमिक शिक्षण नागपुरमध्ये केले. यानंतर केमिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेक, एमबीए फायनान्स, सीएफए आणि पीजीडीसीएचे शिक्षण घेतले. यानंतर गुजरातच्या एका कंपनीत नोकरीही केली. बदलत्या काळानुसार, अमेरिकेच्या एका कंपनीने त्यांना प्रतिवर्ष 1 कोटी रुपयांचे पॅकेज देत आमंत्रित केले. याठिकाणी त्यांनी नोकरी केल्यावर शेवटी आचार्य भगवान यांचे प्रवचन ऐकल्यावर वैराग्यचा मार्ग निवडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
बीटेक, MBA, नंतर अमेरिकेतील 1 कोटी पगाराची नोकरी सोडून निवडला हा मार्ग, या जैन मुनींच्या त्यागाची अनोखी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल