TRENDING:

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला तब्बल 4 दशकानंतर मोठा योग, या गोष्टी घेण्याचं टाळा!

Last Updated:
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपण अनेक अशा नवीन वस्तू खरेदी करतो किंवा दानधर्म देखील करतो.
advertisement
1/7
अक्षय तृतीयेला तब्बल 4 दशकानंतर मोठा योग, या गोष्टी घेण्याचं टाळा!
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी आपण अनेक अशा नवीन वस्तू खरेदी करतो किंवा दानधर्म देखील करतो. तर या दिवशीचं काय महत्त्व आहे? या दिवशी तुम्ही काय दानधर्म करावं? याविषयीचं गुरुजी सुरेश केदारे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/7
30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपण अनेक अशा गोष्टी दानधर्म करतो किंवा नवीन गोष्टी खरेदी देखील करतो. या दिवशी तुम्ही भरभरून असं दानधर्म करावं, असं गुरुजींनी सांगितलं आहे. तसेच तुम्ही या दिवशी नवीन गोष्टी देखील खरेदी करू शकता. कारण की या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
advertisement
3/7
ही जी अक्षय तृतीया आहे ती चतुर्थी युक्त अक्षय तृतीया आहे आणि 41 वर्षानंतर असा योग आलेला आहे. तसेच अक्षय तृतीया खूप वर्षानंतर बुधवारी आली आहे आणि या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे तर असा दुर्मिळ योग या दिवशी आहे.
advertisement
4/7
हा जो योग आलेला आहे या दिवशी जर तुम्ही दानधर्म केले तर तुम्हाला सहस्त्रपट पुण्य मिळतं. या दिवशी तुम्ही जर काही खरेदी करणार असाल तर तुम्ही सर्व गोष्टी खरेदी करू शकता जसे की सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, भूमिपूजन करणे, नवीन वस्तू घेणे किंवा वाहन खरेदी करणे देखील तुम्ही करू शकता. या दिवशी स्टील किंवा ॲल्युमिनियम वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करून नये.
advertisement
5/7
तसंच या दिवशी तुम्ही दानधर्म करायचा असेल तर तुम्ही पशुपक्षांसाठी चारा देऊ शकता किंवा त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील तुम्ही करावी जेणेकरून तुम्हाला भरपूर असं पुण्य मिळेल. जलकुंभ दान तुम्ही मित्रांच्या मुक्तिस्त कुंभदान करावे, असं गुरुजींनी सांगितलं आहे.
advertisement
6/7
या दिवशी तुम्ही वृत्तीचे पात्र धान्य दान कराल. भरपूर असं पुण्य मिळेल. तर या सर्व गोष्टी तुम्ही दानधर्म कराव्यात आणि स्वतः पुण्य मिळवावं, असंही गुरुजी सुरेश केदारे सांगितलेलं आहे.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला तब्बल 4 दशकानंतर मोठा योग, या गोष्टी घेण्याचं टाळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल