TRENDING:

रात्री पडतात वाईट स्वप्नं, लग्नातही अडथळा, वेलची करेल मदत, फक्त करा हा महत्त्वाचा उपाय

Last Updated:
अनेकांना रात्री विविध स्वप्ने पडतात. यामध्ये कधी चांगली तर काही स्वप्ने अत्यंत वाईटही असतात. यामुळे अनेकांची झोप मोड होते. तसेच अनेकांच्या लग्नात अडथळे आणि आर्थिक समस्याही असतात. त्यामुळे यावर नेमका काय उपाय आहे, हेच आपण जाणून घेऊयात. (परमजीतकुमार/देवघर, प्रतिनिधी)
advertisement
1/6
रात्री पडतात वाईट स्वप्नं, लग्नातही अडथळा, वेलची करेल मदत, फक्त करा हा...
देवघरचे आचार्य यांनी याबाबत माहिती दिली. ज्या पदार्थांमध्ये वेलची टाकली जाते, त्याची चवही वाढते. अनेकजण वेलचीचा वापर माऊथ फ्रेशनर म्हणून करतात. मात्र, या वेलचीमुळे अनेक समस्याही सुटू शकतात, असे ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे.
advertisement
2/6
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वेलचीमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते. तसेच सकारात्मक वातावरण घरात तयार होऊ शकते. तसेच या वेलचीमुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकते. तसेच लग्नातील अडथळेही दूर होऊ शकतात.
advertisement
3/6
ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार पाच हिरवी वेलची लाल कापडात बांधून गुरुवारी लक्ष्मी मातेला अर्पण करावी. पूजा समाप्तीनंतर ती वेलची घराच्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने तुमच्यावरील कर्ज समाप्त होईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल.
advertisement
4/6
ज्योतिषाचार्यांनुसार, जर पुन्हा पुन्हा रात्री वाईट स्वप्ने येत असतील, यामुळे तुमची झोपमोड होत असेल तर 11 हिरवी वेलची शनिवारी आपल्या उशीखाली ठेवावी. यामुळे तुम्हाला कोणतेही वाईट स्वप्न येणार नाही. तसेच तुम्हाला झोपही चांगली लागेल.
advertisement
5/6
अनेक तरुण-तरुणींना आजकाल लग्नात अडचणी येत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्न मोडले जाते. अशावेळी जातकाला गुरुवारी मंदिरात जाऊन पिवळे वस्त्र घालून नैवेद्य म्हणून हिरवी वेलची टाकून देवाला अर्पण करावी. तसेच स्वत:ही खावी. तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला प्रसादासह वेलचीही दान करावी. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील.
advertisement
6/6
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
रात्री पडतात वाईट स्वप्नं, लग्नातही अडथळा, वेलची करेल मदत, फक्त करा हा महत्त्वाचा उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल