TRENDING:

Budhwar Upay: बाप्पा मोरया! बुधवारची सुरुवात करा या 5 दिव्य मंत्रांनी, गणेश कृपेनं कार्यात मिळेल यश

Last Updated:
Wednesday Astro tips: हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे बुधवार हा विघ्न दूर करणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. बुधवारी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे.
advertisement
1/6
बाप्पा मोरया! बुधवारची सुरुवात करा या 5 दिव्य मंत्रांनी, गणेश कृपेनं मिळेल यश
बुधवारी विधीनुसार पूजा केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी विघ्नहर्त्याच्या पूजेदरम्यान काही मंत्रांचा जप करणंही आवश्यक आहे. ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून या मंत्रांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
2/6
ज्योतिषांच्या मते श्रीगणेशाच्या पूजेच्या वेळी 'ॐ गं गणपतये नमः' चा जप केलाच पाहिजे. या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र जितका सोपा आहे तितकाच प्रभावी आहे. या मंत्राचा जप आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी लाभदायक ठरतो. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
3/6
'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।' हा मंत्र गणपतीच्या पूजेसाठी दुसरा सर्वात प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 51 किंवा 108 वेळा जप करू शकता. या मंत्राचा अर्थ असा आहे की, ज्यांचे सोंड वक्र आहे, ज्यांचे शरीर विशाल आहे, जे लाखो सूर्यासारखे तेजस्वी आहेत, ते सर्व कार्य कोणत्याही विघ्नविना पूर्ण करून प्रसन्न व्हावेत. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
4/6
'ॐ श्रीं गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा।' गणपतीला समर्पित या मंत्रामुळे समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पूजेच्या वेळी या मंत्राचा जप केल्यानं व्यक्तीच्या नोकरीच्या समस्या लगेच दूर होतात. तसेच जीवनात प्रगती होते. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
5/6
बुधवारी गणपतीची पूजा करताना 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 51 किंवा 108 वेळा जप देखील करू शकता. दर बुधवारी या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या जपाने अनेक त्रास दूर होतात. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
6/6
भगवान गणेशाला समर्पित 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा बुधवारी जप करावा. या मंत्राचा उच्चार पूर्ण भक्तिभावानं केल्यास जीवनातून अंधकार नाहीसा होतो. जीवनात येणारी सर्व संकटं दूर होतील. (इमेज-कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Budhwar Upay: बाप्पा मोरया! बुधवारची सुरुवात करा या 5 दिव्य मंत्रांनी, गणेश कृपेनं कार्यात मिळेल यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल