Chandra Grahan 2024 : यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं मोठं संकट, आयुष्य होईल बेरंग, हा आहे तोडगा!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा पांढऱ्या वस्तूंचा कारक ग्रह मानला गेला आहे. त्यामुळे चंद्र ग्रहणानंतर काही पांढऱ्या वस्तू दान केल्यास ग्रहणाचा दुष्परिणाम जाणवत नाही.
advertisement
1/5

खगोलशास्त्रीयदृष्ट्या चंद्र, सूर्यग्रहण या महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. या घटनांना अध्यात्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा, तर सूर्य आरोग्याचा कारक मानला गेला आहे. चंद्र किंवा सूर्यग्रहण अशुभ मानलं जातं. ग्रह आणि ग्रहणाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून ग्रहणाच्या दिवशी विशिष्ट वस्तू दान कराव्यात, असं जाणकार सांगतात.
advertisement
2/5
यंदा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (25 मार्च) चंद्रग्रहण आहे. या दिवशी धूलिवंदनदेखील आहे. चंद्रग्रहणाच्या निमित्ताने जीवनातल्या अडचणी दूर व्हाव्यात, ग्रह आणि लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त व्हावी याकरिता काही वस्तू दान कराव्यात.
advertisement
3/5
होळीच्या दुसऱ्या दिवशी (25 मार्च) 2024मधलं पहिलं चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक किंवा वेधादी नियम पाळायची गरज नाही; पण चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम जाणवू नयेत यासाठी काही वस्तू दान कराव्यात. आपल्याकडे 'दे दान सुटे गिरान' असं म्हटलं जातं. ग्रहणानंतर दान देणं पुण्यप्रद मानलं जातं. 25 मार्च रोजी सकाळी दहा वाजून 24 मिनिटांनी चंद्रग्रहणाची सुरुवात होईल. दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी ग्रहण सुटेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण असेल. चंद्र आणि सूर्यग्रहण अशुभ मानलं जातं. या काळात वातावरणात नकारात्मकता वाढते. त्यामुळे ग्रहण काळात काही नियमांचं पालन केलं जातं. तसंच ग्रहण सुटल्यावर दानधर्म केला जातो.
advertisement
4/5
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा पांढऱ्या वस्तूंचा कारक ग्रह मानला गेला आहे. त्यामुळे चंद्र ग्रहणानंतर काही पांढऱ्या वस्तू दान केल्यास ग्रहणाचा दुष्परिणाम जाणवत नाही. लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणानंतर तांदूळ, दूध, तसंच पांढरं वस्त्र आणि पांढऱ्या रंगाची मिठाई दान करू शकता. कुंडलीत चंद्र दोष असेल किंवा चंद्र कमकुवत स्थितीत असेल तर मोती, चांदीच्या वस्तू दान केल्यास चंद्रबळ वाढू शकतं. चंद्रग्रहणानंतर गरीब, गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध दान करावं. यामुळे लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं जाणकार सांगतात.
advertisement
5/5
कुंडलीत चंद्र दोष असेल किंवा चंद्र कमकुवत स्थितीत असेल तर मोती, चांदीच्या वस्तू दान केल्यास चंद्रबळ वाढू शकतं. चंद्रग्रहणानंतर गरीब, गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध दान करावं. यामुळे लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं जाणकार सांगतात.Disclaimer: ( इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Chandra Grahan 2024 : यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं मोठं संकट, आयुष्य होईल बेरंग, हा आहे तोडगा!