TRENDING:

Friday Astro Tips: शुक्रवारचे 5 सोपे उपाय! लक्ष्मी कृपेनं घरात धन, वैभव, ऐश्वर्य वाढत राहील

Last Updated:
Friday Astro Tips Marathi: धन आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी अनेकजण व्रत ठेवून विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करतात. घरात लक्ष्मीचा आशीर्वाद असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच शुक्रवार हा सुख-सुविधांचा कारक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. कुंडलीतील शुक्र ग्रहाला बलवान बनवण्यासाठी शुक्रवारी व्रत पाळले जाते आणि त्याच्याशी संबंधित वस्तूंचे दानही केले जाते. जाणून घेऊया तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून शुक्रवारचे सोपे ज्योतिषीय उपाय.
advertisement
1/5
शुक्रवारचे 5 सोपे उपाय! लक्ष्मी कृपेनं घरात धन, वैभव, ऐश्वर्य वाढत राहील
लक्ष्मी गायत्री मंत्र -ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्नीय च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा जप केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. जीवनातील संकटे दूर होतील. लक्ष्मी गायत्री मंत्राच्या शुभ प्रभावाने कीर्ती, संपत्ती, वैभव इ. सुख प्राप्त होईल.
advertisement
2/5
देवी लक्ष्मीचा प्रभावी मंत्र - ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम: हा देवी लक्ष्मीचा प्रभावी मंत्र आहे. शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर पूजास्थानी बसून या लक्ष्मी मंत्राचा जप करावा. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होतील.
advertisement
3/5
शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना तिला खीर अर्पण करा. यासाठी गहू किंवा तांदळाची खीर बनवू शकता. याशिवाय देवी लक्ष्मीला दूधापासून बनवलेले गोड पदार्थ, पांढरी मिठाई अर्पण करू शकता. या गोष्टी देवी लक्ष्मीचे आवडते प्रसाद आहेत. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.
advertisement
4/5
शुक्रवारी, प्रदोष कालात म्हणजेच सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मीसह गणेशाची पूजा करू शकता. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा मजकूर संस्कृतमध्ये आहे. परंतु, विधीप्रमाणे त्याचे पठण करणाऱ्याला अपार धन प्राप्त होते, असे मानले जाते.
advertisement
5/5
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण करणे देखील शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Friday Astro Tips: शुक्रवारचे 5 सोपे उपाय! लक्ष्मी कृपेनं घरात धन, वैभव, ऐश्वर्य वाढत राहील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल