TRENDING:

Garud Purana: घरातील मृत व्यक्तिच्या वस्तूंविषयी इतका निष्काळजीपणा करू नये; मागे सगळ्यांना त्रास

Last Updated:
Garud Purana Death Tips: अजूनपर्यंत तरी कोणाला मृत्यूवर विजय मिळवता आलेला नाही. या जगात जन्म घेतलेला व्यक्ती, कधी कोणत्या क्षणी मृत्युमुखी पडेल, सांगता येत नाही. मृत्यू त्रिवार सत्य आहे, ते कोणीही टाळू शकलेलं नाही. व्यक्ती जरी गेली तरी तिच्या चांगल्या-वाईट आठवणी आणि तिच्याशी संबंधित वस्तू (उदा. कपडे, दागिने, पुस्तके, फर्निचर किंवा दैनंदिन वापरातील वस्तू) येथेच राहतात.
advertisement
1/6
घरातील मृत व्यक्तिच्या वस्तूंविषयी इतका निष्काळजीपणा करू नये; मागे दोष राहतात
घरातील मृत व्यक्तिच्या या वस्तूंचे काय करावे? या वस्तू घरात ठेवणं योग्य आहे की, त्या गरजूंना दान कराव्यात? गरुड पुराणात याबद्दल स्पष्टपणे काही बाबी सांगितल्या आहेत, त्या समजून घेऊ.
advertisement
2/6
मृत व्यक्तीचे दागिने घालावेत का?गरुड पुराणात सांगितल्यानुसार मृत व्यक्तीचे दागिने किंवा अलंकार परिधान करू नयेत. मात्र, त्यांचे दागिने जपून ठेवता येतील. शास्त्रांनुसार, मृत्यूनंतरही आत्म्याचा या दागिन्यांवर मोह राहतो, त्यामुळे ते दागिने शक्यतो परिधान करणे टाळावे. त्यांचे दागिने कोणी घातल्यास त्या व्यक्तीच्या आत्म्याचा मोह वाढू शकतो आणि त्याला पुढील प्रवासाला जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
advertisement
3/6
पण, जर त्या व्यक्तीने मरण्यापूर्वी आपले दागिने प्रेमानं कोणाला दिले असतील, तर ते वापरण्यास कोणतीही अडचण नाही. याव्यतिरिक्त, हवे असल्यास ते मोडून नवीन डिझाइनमध्ये बनवून परिधान केले जाऊ शकतात.
advertisement
4/6
मृत व्यक्तीच्या कपड्यांचे काय करायचं?गरुड पुराणानुसार, कोणत्याही मृत व्यक्तीचे कपडे घालणे योग्य मानले जात नाही. याचे कारण म्हणजे, कपड्यांशी देखील मृताचा मोह जोडलेला असतो. त्यामुळे जर कुटुंबातील किंवा जवळचे लोक हे कपडे परिधान करत असतील, तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यानं मृताच्या आत्म्याचे या जगाशी असलेले नाते तुटत नाही आणि तो याच जगात भटकत राहतो. इतकेच नाही तर मृत व्यक्तीचे कपडे परिधान केल्याने पितृदोष देखील लागू शकतो. शक्य असल्यास हे कपडे गरजूंना किंवा गरीब लोकांना दान करावेत, यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि वस्तूचा योग्य उपयोग देखील होतो.
advertisement
5/6
मृत व्यक्तीच्या इतर वस्तूंचे काय करावे?कोणीही व्यक्ती गेल्यानंतर तिच्या वस्तू आठवणींच्या रूपात आपल्याजवळ राहतात. गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे घड्याळ अजिबात परिधान करू नये, कारण यामुळे पितृदोष लागू शकतो. याव्यतिरिक्त, कंगवा, शेव्हिंग किट, ग्रूमिंगशी संबंधित वस्तू आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू देखील वापरू नयेत. या वस्तू दान कराव्यात किंवा नष्ट कराव्यात.
advertisement
6/6
मृत व्यक्तीचे अंथरूण देखील दान करून टाकावे. तसेच, मृत व्यक्तीची कुंडली घरात ठेवू नये. ती मंदिरात ठेवून देणे किंवा एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने मृताच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यास मदत होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Garud Purana: घरातील मृत व्यक्तिच्या वस्तूंविषयी इतका निष्काळजीपणा करू नये; मागे सगळ्यांना त्रास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल