TRENDING:

Magh Purnima 2026 Upay: सुख-समृद्धी, यश मिळवण्यासाठी माघी पौर्णिमेला करावयाचे 5 उपाय; देवीचा आशीर्वाद

Last Updated:
Magh Purnima 2026 Astrological Remedies: हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी हा शुभ दिवस फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026, रविवार रोजी आला आहे. हा दिवस स्नान, दान, व्रत आणि पूजेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, माघ पौर्णिमेला देवता पृथ्वीवर संचार करतात आणि मानवाने केलेले दान, जप-तप व सेवा स्वीकारतात.
advertisement
1/6
सुख-समृद्धी, यश मिळवण्यासाठी माघी पौर्णिमेला करावयाचे 5 उपाय; देवीचा आशीर्वाद
ज्योतिष शास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. या उपायांमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते. माघ पौर्णिमेचे काही प्रभावी ज्योतिष उपाय खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
2/6
तूळस आणि लक्ष्मी पूजन - माघ पौर्णिमेला सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करून दिवा लावावा. त्यानंतर माता लक्ष्मीची विधीवत पूजा करावी. लक्ष्मीला 11 कौड्या अर्पण करून त्यांना हळदीने टिळक लावावे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
advertisement
3/6
पिंपळाची पूजा आणि परिक्रमा - या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. एका लोट्यात पाणी आणि दूध मिसळून ते पिंपळाला अर्पण करावे आणि तिथे 5 प्रकारच्या मिठाया ठेवाव्यात. त्यानंतर धूप-दिवा लावून झाडाला 11 वेळा परिक्रमा करावी आणि आपल्या इच्छा व्यक्त कराव्यात. संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या कृपेने सुख-शांती लाभते.
advertisement
4/6
विष्णू पूजन आणि पांढऱ्या चंदनाचा वापर - माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू जलामध्ये निवास करतात असे मानले जाते. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांना पांढरा चंदन लावावा. यामुळे घरातील कलह दूर होतात आणि नोकरी-व्यवसायातील अडचणींतून सुटका मिळते.
advertisement
5/6
कनकधारा स्तोत्र पठण आणि आरती - माघ पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीशी असल्याने या दिवशी विष्णूंसोबतच लक्ष्मीची पूजा करून लाल फुले अर्पण करावीत. शुद्ध तुपाने आरती करावी आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
advertisement
6/6
विशेष दान आणि त्याचे महत्त्व - ज्योतिष शास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी तीळ आणि गूळ, उबदार कपडे, ब्लँकेट, धान्य, पुस्तके, जोडे-चप्पल तसेच फळे आणि फुलांचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या वस्तूंचे दान केल्याने ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Magh Purnima 2026 Upay: सुख-समृद्धी, यश मिळवण्यासाठी माघी पौर्णिमेला करावयाचे 5 उपाय; देवीचा आशीर्वाद
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल