TRENDING:

PitruDosh: घरात पितृदोष असल्यास स्वप्नात वारंवार या गोष्टी दिसतात; अमावस्या पौर्णिमेला हे उपाय

Last Updated:
Dream Interpretation: सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला स्वप्नं पडत असतं. स्वप्नात काही गोष्टी पाहिल्यानं माणसाला भीती वाटते, तर काही स्वप्ने पाहिल्याने माणसाला आनंद होतो. स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा वास्तविक जीवनाशी संबंध असतोच असे नाही. कालसर्प आणि पितृदोष असल्यास काही प्रकारच्या गोष्टी वारंवार स्वप्नात दिसतात. त्याविषयी आज जाणून घेऊ.
advertisement
1/6
घरात पितृदोष असल्यास स्वप्नात वारंवार या गोष्टी दिसतात; कोणते उपाय करावे
स्वप्नात आई-वडील दुःखी पाहणं -स्वप्नात आई-वडील दुःखी दिसणं अशुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर संतुष्ट नाहीत. तसेच, येणाऱ्या काळात तुम्हाला काही नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबात काही अशुभ घटना घडू शकतात. एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला असे स्वप्न वारंवार दिसत असेल तर तुमच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो.
advertisement
2/6
स्वप्नात वारंवार साप दिसणे -स्वप्नशास्त्रानुसार, वारंवार सापांशी संबंधित स्वप्ने पडत असतील किंवा स्वप्नात साप चावल्याचे दिसत असेल तर कुंडलीत कालसर्प दोष असल्याचे लक्षण आहे. असे वारंवार घडत असल्यास तुम्ही कालसर्प दोष शांत करून घ्यावा.
advertisement
3/6
स्वप्नात विचित्र गोष्टी पाहणे -स्वप्नात मृत लोक काहीतरी मागताना दिसले, पाण्यात बुडताना दिसले, स्वतःचा अपघात होताना दिसला, उंचीवरून पडताना दिसले. कुंडलीत कालसर्प-पितृदोष असल्यास अशा गोष्टी होतात, त्यावर उपाययोजना करू शकता.
advertisement
4/6
पितृदोष असू शकतो -स्वप्नात तुमचे पूर्वज रागावलेले किंवा अत्यंत संतप्त दिसत असतील तर याचा अर्थ ते तुमच्यावर नाराज आहेत. तुमच्या कुंडलीत पितृदोष असण्याची शक्यता आहे. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
advertisement
5/6
पितृदोष आणि कालसर्प दोषासाठी उपाय - जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्ही सोमवारी महादेवाला दूध आणि दह्याने अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा.
advertisement
6/6
कुंडलीत पितृदोष असेल तर प्रत्येक अमावस्येला घरी गीतेतील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठण करावे. प्रत्येक चतुर्दशीला (अमावस्या आणि पौर्णिमेच्या एक दिवस आधी), पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करा आणि भगवान विष्णूची प्रार्थना करा. तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
PitruDosh: घरात पितृदोष असल्यास स्वप्नात वारंवार या गोष्टी दिसतात; अमावस्या पौर्णिमेला हे उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल