Pitru Paksha 2025: पितृपक्षात तुळशीची पूजा करावी की नको? शास्त्र काय सांगतं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीची रोज पूजा केली जाते. पितृपक्षात अशी पूजा करण्याबाबत बऱ्याचदा संभ्रम असतो. याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्यात येणारा पितृपक्ष हा महत्त्वाचा मानला जातो. या 15 दिवसांत पितरांच्या आत्मशांतीसाठी विशेष पूजा, पिंडदान आणि धार्मिक विधी केले जातेत. या दिवसांत पितृदेव आपल्या घरी जेवणासाठी येतात अशी एक मान्यता आहे. त्यामुळे तिथीनुसार या काळात पितरांना अन्न आणि पाणी अर्पण केले जाते.
advertisement
2/7

हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीची रोज पूजा केली जाते. पितृपक्ष हा पितरांचा काळ मानला जातो. त्यामुळे या दिवसांत तुळशीपूजन करावे की नको? असा संभ्रम अनेकांच्यात असतो. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत पितृपक्ष येतो. या काळात पितरांच्या शांतीसाठी विविध प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. या दिवसांत तुळशीची पूजाही निषिद्ध नाही. त्यापेक्षा पितृ पक्षात तुळशीपूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
advertisement
4/7
शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये तुळशी ही वनस्पती सकारात्मकता प्रदान करते. या काळात तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पूर्वज रागावले तर तेही शांत होतात. पिशाच्च जगात अडकलेल्या पितरांनाही मोक्ष मिळतो.
advertisement
5/7
पितृ पक्षादरम्यान पितरांना नैवेद्य दाखवला जातो, ज्याद्वारे पितरांना पाणी आणि अन्न मिळते. असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवन आनंदी होते. पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यास तुमच्या पूर्वजांना कोणत्याही प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.
advertisement
6/7
दरम्यान, यंदा पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 7 सप्टेंबरपासून सुरू होऊन अश्विन कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच 21 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या काळात पितर आणि पूर्वजांसाठी विशेष पूजन पिंडदान व धार्मिक विधी पार पडतील.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Pitru Paksha 2025: पितृपक्षात तुळशीची पूजा करावी की नको? शास्त्र काय सांगतं?