TRENDING:

Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराला दोन वर्षे पूर्ण; भाविकांची गर्दी, 31 डिसेंबरला भरगच्च कार्यक्रम

Last Updated:
Ayodhya Ram Mandir: अयोध्या नगरीत भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. चारी बाजूंनी पूजा, पाठ, हवन आणि कीर्तनाचे सूर ऐकू येत आहेत. या धार्मिक सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून जगद्गुरु मध्वाचार्य यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत.
advertisement
1/4
अयोध्येच्या राम मंदिराला दोन वर्षे पूर्ण; भाविकांची गर्दी, 31 डिसेंबरला उत्सव
31 डिसेंबरलाच का उत्सव?अयोध्येत श्री रामाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी झाली होती. मात्र, हिंदू परंपरेनुसार कोणताही धार्मिक वर्धापन दिन हा तिथीनुसार साजरा केला जातो. श्रीरामलला यांची प्राणप्रतिष्ठा पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला झाली होती. याच परंपरेनुसार पहिला वर्धापन दिन 11 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला होता. आता हिंदू पंचांगानुसार ही द्वादशी तिथी 31 डिसेंबर 2025 रोजी येत आहे, म्हणून या दिवशी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
advertisement
2/4
धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा - या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक विधींना 27 डिसेंबर 2025 पासून सुरुवात झाली आहे. मुख्य सोहळा 31 डिसेंबर रोजी होईल, तर इतर धार्मिक कार्यक्रम 2 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 31 डिसेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात असलेल्या माता अन्नपूर्णा मंदिरात ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
advertisement
3/4
सांस्कृतिक आणि विशेष आयोजन - कार्यक्रमांच्या मालिकेनुसार 29 डिसेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल, ज्यामध्ये विविध धार्मिक आणि कलात्मक सादरीकरणे होतील. भाविकांच्या सोयीसाठी सुग्रीव पथ मार्ग तयार करण्यात आला आहे. राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर अयोध्या पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे. गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
4/4
या उत्सवामुळे संपूर्ण अयोध्या नगरीत आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवून 25 नोव्हेंबर ही तारीख इतिहासात नोंदवली आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्यानंतर आता हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराला दोन वर्षे पूर्ण; भाविकांची गर्दी, 31 डिसेंबरला भरगच्च कार्यक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल