TRENDING:

उद्या 15 जानेवारी! किंक्रांतीला घ्या विशेष काळजी, 'या' 7 गोष्टी टाळाच; अन्यथा सोसावे लागतील हाल

Last Updated:
मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'किंक्रांत'. हिंदू पंचांगानुसार, या दिवसाला 'कर' किंवा 'करिदिन' असेही म्हटले जाते. शास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
1/7
किंक्रांतीला घ्या विशेष काळजी, 'या' 7 गोष्टी टाळाच; अन्यथा सोसावे लागतील हाल
मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'किंक्रांत'. हिंदू पंचांगानुसार, या दिवसाला 'कर' किंवा 'करिदिन' असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, संक्रांती देवीने 'किंकर' नावाच्या राक्षसाचा वध याच दिवशी केला होता. हा दिवस संघर्षाचा आणि संहारक शक्तींचा मानला जातो, म्हणूनच शास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
2/7
नवीन शुभ कार्याची सुरुवात: किंक्रांतीला 'अशुभ' काळ मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करणे टाळावे. या दिवशी केलेल्या कामात अडथळे येण्याची शक्यता असते, अशी मान्यता आहे.
advertisement
3/7
लांबचा प्रवास टाळा: जुन्या काळापासून किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणे वर्ज्य मानले जाते. या दिवसाला 'करिदिन' म्हटले जात असल्याने प्रवासात अपघात किंवा अडचणी येऊ शकतात, असा समज आहे. शक्य असल्यास या दिवशी घरीच राहून विश्रांती घ्यावी.
advertisement
4/7
केस आणि नखे कापू नका: या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक लहरींशी जोडलेली असते. त्यामुळे केस धुणे, नखे काढणे किंवा दाढी करणे या दिवशी टाळावे. असे केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.
advertisement
5/7
मोकळ्या केसांनी काम करणे: महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर वेणी घालावी. मोकळ्या केसांनी घरातील कामे करणे किंवा कचरा काढणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते, अशी ग्रामीण भागात आजही धारणा आहे.
advertisement
6/7
वादविवाद आणि राग: किंक्रांत हा दिवस शांत राहण्याचा आहे. या दिवशी घरामध्ये कटकट, भांडण किंवा कोणाचाही अपमान करू नये. घरातील कलहामुळे नकारात्मक शक्तींना वाव मिळतो, ज्यामुळे वर्षभर घरात अशांतता राहू शकते.
advertisement
7/7
महत्त्वाची खरेदी टाळा: सोन्या-चांदीचे दागिने, नवीन वाहन किंवा जमिनीची खरेदी या दिवशी करू नये. मकर संक्रांतीला तुम्ही खरेदी करू शकता, पण किंक्रांतीला पैसे गुंतवणे भविष्यासाठी जड ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या 15 जानेवारी! किंक्रांतीला घ्या विशेष काळजी, 'या' 7 गोष्टी टाळाच; अन्यथा सोसावे लागतील हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल