TRENDING:

Tortoise : घरात कासवाची मुर्ती ठेवताय? चुकूनही करू नका 'या' चुका; जाणून घ्या कोणत्या दिशेला ठेवल्याने होईल धनवर्षाव

Last Updated:
हिंदू परंपरेत आणि वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय उपाय म्हणजे 'धातूचे कासव'.
advertisement
1/8
घरात कासवाची मुर्ती ठेवताय? करू नका 'या' चुका; कोणत्या दिशेला ठेवावी जाणून घ्या
कधीकधी एखाद्यासोबत असं होतं की त्याने कितीही कष्ट केले तरी कधीकधी घरात पैसा टिकत नाही किंवा कामात सतत अडथळे येतात. अशा वेळी आपण वास्तूतील दोषांकडे वळतो. हिंदू परंपरेत आणि वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय उपाय म्हणजे 'धातूचे कासव'.
advertisement
2/8
अनेकांच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा दुकानात तुम्ही कासवाची मूर्ती पाहिली असेल. कासव हे केवळ दीर्घायुष्याचे प्रतीक नाही, तर ते भगवान विष्णूच्या 'कूर्म' अवताराशी जोडलेले आहे. मात्र, केवळ हौस म्हणून कासव घरात ठेवण्यापेक्षा, ते कोणत्या धातूचे असावे आणि कोणत्या दिशेला असावे, याचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. चला तर मग, तुमच्या राशीनुसार आणि गरजेनुसार कोणते कासव तुमच्यासाठी भाग्योदय ठरेल, ते पाहूया.
advertisement
3/8
कासव आणण्यासाठी 'हा' दिवस आहे सर्वात शुभवास्तुशास्त्रानुसार, कासवाची मूर्ती कधीही कोणत्याही दिवशी विकत आणू नये. पौर्णिमेचा दिवस कासव घरी आणण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. कासव घरी आणल्यानंतर त्याला काही वेळ 'कच्च्या दुधात' ठेवावे. त्यानंतर दिवसातील सर्वात शुभ वेळ असलेल्या 'अभिजित मुहूर्तावर' ते दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावे आणि त्याची स्थापना करावी.
advertisement
4/8
स्थापना करण्याची योग्य पद्धत आणि दिशाकासव हा जलचर प्राणी असल्याने त्याला नेहमी एका पाण्याने भरलेल्या बाऊलमध्ये ठेवावे.दिशा: हा पाण्याचा बाऊल घराच्या ईशान्य (North-East) कोपऱ्यात ठेवावा.मंत्र: स्थापना करताना 'ॐ श्रीं कुर्मय नमः' या मंत्राचा 11 वेळा जप करावा.मुख्य तोंड: कासवाचे तोंड नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेला असावे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात येईल.बाऊलमधील पाणी दर दोन दिवसांनी बदलत राहावे.
advertisement
5/8
कोणत्या धातूचे कासव काय लाभ देते?तुमच्या समस्येनुसार योग्य धातूची निवड करणे फायद्याचे ठरते:सोन्याचे कासव: जर तुम्हाला आर्थिक अडचणींतून कायमची सुटका हवी असेल, तर सोन्याचे कासव घरात ठेवणे अत्यंत फलदायी मानले जाते.चांदीचे कासव: घरातील कलह कमी करण्यासाठी, मनःशांतीसाठी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांदीचे कासव निवडावे.तांब्याचे कासव: विद्यार्थी आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी तांब्याचे कासव शुभ ठरते.पितळी कासव: ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा व्यवसायात प्रसिद्धी मिळवण्यासाठी पितळी कासव ठेवणे फायदेशीर आहे.स्फटिक (Crystal) कासव: वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी स्फटिकाचे कासव उत्तम आहे.
advertisement
6/8
ज्यांना अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी घरामध्ये 'मोठ्या कासवाच्या पाठीवर लहान कासव' असलेली मूर्ती ठेवावी.कौटुंबिक एकोप्यासाठी: कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र आणि प्रेमाने राहावे असे वाटत असेल, तर एकावर एक 'तीन कासव' असलेली मूर्ती घरामध्ये ठेवावी.
advertisement
7/8
वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने ठेवलेले कासव केवळ संपत्तीच नाही, तर सुख आणि शांती देखील घेऊन येते. तुमच्या घरातील उर्जेमध्ये बदल घडवण्यासाठी हा छोटासा बदल नक्की करून पहा.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचव्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Tortoise : घरात कासवाची मुर्ती ठेवताय? चुकूनही करू नका 'या' चुका; जाणून घ्या कोणत्या दिशेला ठेवल्याने होईल धनवर्षाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल