राहूचा नक्षत्रप्रवेश अन् 3 राशींच्या अडचणींचा नायनाट! जुलै महिना सुखाचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांना विशेष महत्त्व आहे. नवग्रह वेळोवेळी आपली रास बदलतात. ज्याचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो. सूर्य आणि चंद्र सोडून इतर सर्व ग्रह वक्र स्थितीत राशीप्रवेश करतात. तर, राहू आणि केतूची चाल मात्र कायम वक्र असते. राहू ग्रहाला सर्वात शक्तिशाली ग्रह म्हणतात, शिवाय त्याला पापी ग्रहसुद्धा मानलं जातं. तो अनेक राशींच्या आयुष्यात अडचणी आणतो, परंतु जेव्हा राहूची कृपा होते, तेव्हा मात्र त्या राशींच्या व्यक्तींना भरभरून सुख, समाधान, यश मिळतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, येत्या 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी राहू उत्तरा भाद्रपद या शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रप्रवेशाचा काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ होणार आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना नक्की काय सुख मिळणार, जाणून घेऊया.
advertisement
2/5
वृषभ : आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या क्षेत्रात हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. राहूचं हे नक्षत्रपरिवर्तन आपल्यासाठी अतिशय शुभ ठरेल. दीर्घकाळापासून अडकलेली आपली कामं आता मार्गी लागतील. व्यापार विस्तारेल, आर्थिक स्थिती भक्कम होईल, समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
3/5
तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. शत्रूंचा नाश होईल. नोकरीत मोठी जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.
advertisement
4/5
वृश्चिक : आपलं उत्पन्न कमालीचं वाढणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. दाम्पत्य जीवनात <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/todays-horoscope-18th-june-2024-this-zodiac-sign-will-get-opportunities-for-financial-gain-gh-mhpd-1200063.html">आनंद</a> येईल. आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील. वाहनखरेदीचा योग आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/2-rajyoga-will-change-destiny-of-3-zodiac-signs-astrologer-has-predicted-l18w-mhij-1200152-page-4.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
राहूचा नक्षत्रप्रवेश अन् 3 राशींच्या अडचणींचा नायनाट! जुलै महिना सुखाचा