मी माफी मागतो,मला जाऊ द्या; 2 कोटीच्या खेळाडूची आयपीएलमधून माघार, आता तीन वर्षासाठी बॅन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएलचा हंगाम सूरू होण्यापूर्वी एका स्टार खेळाडूने लीगमधून माघार घेतली आहे. या खेळाडूला 2 कोटीच्या रक्कमेत दिल्ली कॅपिटल्सने ताफ्यात घेतले होते.
advertisement
1/9

आयपीएल 2026 च्या हंगामाला चार दिवसांनी म्हणजेच 28 मार्च 2026 ला सूरूवात होणार आहे. तत्पुर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/9
आयपीएलचा हंगाम सूरू होण्यापूर्वी एका स्टार खेळाडूने लीगमधून माघार घेतली आहे. या खेळाडूला 2 कोटीच्या रक्कमेत दिल्ली कॅपिटल्सने ताफ्यात घेतले होते.
advertisement
3/9
तसेच दिल्ली कॅपिटल्स त्याला केएल राहुलसोबत ओपनिंगचा जो़डीदार म्हणून पाहत होते. पण आयपीएल सूरू होण्याआधीच या खेळाडूने माघार घेतली आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/9
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट आहे. डकेटला दिल्ली कॅपिटलने 2 कोटी रुपयात ताफ्यात घेतलं होतं. पण आता आयपीएलच्या तोंडावर त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
advertisement
5/9
हा निर्णय घेणे, माझ्यासाठी खूप अवघड होते आणि मी यावर्षी आयपीएल खेळण्यास येत नसल्या कारणाने मी दिल्लीतील प्रत्येकाची माफी मागतो,असे डकेटने टेलेग्राफ स्पोर्टशी बोलताना सांगितले आहे.
advertisement
6/9
जेव्हा मी लिलावासाठी नाव दिले, तेव्हाच मला जाणवलेले ही माझ्यासाठी सूवर्णसंधी ठरेल. दिल्लासारख्या फ्रेंचायजीने माझी निवड करणे. ही एक अप्रतिम गोष्ट होती.मी पुर्णपणे भारावून गेलो होतो.जगातील सर्वोत्तम खेळाडूचा समावेश असलेली ही सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि तिथे खेळणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला असता.
advertisement
7/9
मी आयपीएलमध्ये कधीच खेळलो नाही.कदाचित मी आता आयपीएलचा निरोप घेत आहे की काय, हे मला नक्की सांगता येन नाहीये.
advertisement
8/9
इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे आणि मला इंग्लिश क्रिकेटसाठी माझे सर्वस्व द्यायचे आहे. त्यासाठी, उन्हाळ्यापूर्वी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोत्तम स्थितीत असेन याची मला खात्री करणे आवश्यक आहे, असे सांगत त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.
advertisement
9/9
दरम्यान आता बेन डकेटने आयपीएलमधून माघार घेतल्याने आता त्याच्यावर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई होणार आहे.त्यामुळे आता त्याला 2029 पर्यंत तरी आयपीएलमध्ये खेळता येणार नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मी माफी मागतो,मला जाऊ द्या; 2 कोटीच्या खेळाडूची आयपीएलमधून माघार, आता तीन वर्षासाठी बॅन