TRENDING:

T20 World Cup : टॉस जिंकल्यानंतर सूर्या कोणता निर्णय घेणार? फायनल मॅचआधीच सांगून टाकला गेम प्लान

Last Updated:
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषेदत सूर्याने फायनल सामन्यावरील प्रत्येक सामन्यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
advertisement
1/8
टॉस जिंकल्यानंतर सूर्या कोणता निर्णय घेणार? फायनल मॅचआधीच सांगून टाकला गेम प्ला
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये उद्या रविवारी 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.
advertisement
3/8
दरम्यान या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषेदत सूर्याने फायनल सामन्यावरील प्रत्येक सामन्यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
advertisement
4/8
सगळेच म्हणतात आम्ही प्रेक्षकांना शांत ठेवू. पण माझ्यासाठी हा सामना एक वेगळा अनुभव आहे कारण स्वत:च्या टीमचं घरच्या मैदानावर नेतृत्व करणे,असे सूर्यकुमार यादव म्हणतो.
advertisement
5/8
न्यूझीलंड हा एक अतिशय चांगली रणनिती आखणारा संघ आहे. त्यांच्याकडे त्याचे स्वत:चे प्लान्स असतात. पण आम्ही देखील मैदानावर काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सूर्याने सांगितले.
advertisement
6/8
तसेच कोणत्याही सामन्यात टॉस हा खूप महत्वाचा असतो. कारण दुसऱ्या वेळेस फलंदाजी ड्यू ची समस्या जाणवू शकते,अशा परिस्थितीत भारत फायनलच टॉस जिंकल्यावर काय निर्णय घेणार? असा सवाल पत्रकारांनी सूर्यकुमार यादवला विचारला होता.
advertisement
7/8
आम्ही दोन्हीची तयारी केली आहे, लक्ष्याचा पाठलाग करूनही जिंकायचं आहे आणि लक्ष्याचा बचाव करताना जिंकायच आहे,असे सूर्याने सांगितलं आहे.
advertisement
8/8
तसेच आम्ही चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. जर आम्ही 250 धावा ठोकल्या तर आम्ही जिंकू असा सूर्यकुमार यादवला विश्वास आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टॉस जिंकल्यानंतर सूर्या कोणता निर्णय घेणार? फायनल मॅचआधीच सांगून टाकला गेम प्लान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल