TRENDING:

उद्या रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, लव्ह लाइफमध्ये पुन्हा येईल गोडवा, बिघडलेल्या नात्यात येईल प्रेमाची बहार!

Last Updated:
होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आता वेध लागले आहेत ते रंगपंचमीचे. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगपंचमीचा सण केवळ रंगांच्या उधळणीसाठी नसून, तो आपल्या आयुष्यातील नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
advertisement
1/7
उद्या रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, लव्ह लाइफमध्ये पुन्हा येईल गोडवा!
होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आता वेध लागले आहेत ते रंगपंचमीचे. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगपंचमीचा सण केवळ रंगांच्या उधळणीसाठी नसून, तो आपल्या आयुष्यातील नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक आयुष्यात काही काळ दुरावा आला असेल, तर यंदाची रंगपंचमी तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आली आहे.
advertisement
2/7
राधा-कृष्णाला गुलाबी गुलाल अर्पण करा: राधा-कृष्ण हे प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक मानले जातात. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी राधा-कृष्णाच्या मूर्तीला किंवा फोटोला गुलाबी रंगाचा नैसर्गिक गुलाल अर्पण करा. गुलाबी रंग हा प्रेमाचा आणि स्नेहाचा रंग आहे. यामुळे तुमच्या नात्यातील कडवटपणा दूर होऊन प्रेमाची नवी सुरुवात होते.
advertisement
3/7
'ओम क्लीं कृष्णाय नमः' मंत्राचा जप: देवाला गुलाल अर्पण करताना 'ओम क्लीं कृष्णाय नमः' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. 'क्लीं' हा कामबीज मंत्र असून तो आकर्षण आणि प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या मंत्राच्या प्रभावाने जोडीदाराशी असलेले मनमुटाव संपण्यास मदत होते.
advertisement
4/7
जोडीदाराला अर्पण करा पिवळा रंग: जर तुमच्या नात्यात वारंवार वाद होत असतील, तर जोडीदाराला पिवळ्या रंगाचा गुलाल लावा. पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे. यामुळे नात्यात विश्वास वाढतो आणि विचारांमधील भिन्नता कमी होते.
advertisement
5/7
गुलाबाच्या अत्तराचा वापर: रंगपंचमीच्या दिवशी राधा-कृष्णाला आणि स्वतःलाही थोडे गुलाबाचे अत्तर लावा. अत्तराचा सुगंध शुक्र ग्रहाला बलवान करतो. ज्यांचा शुक्र प्रबळ असतो, त्यांच्या लव्ह लाईफमध्ये नेहमीच सुखाचे दिवस असतात.
advertisement
6/7
घरामध्ये गंगाजल शिंपडा: रंगपंचमीच्या दिवशी हवेत रंग उडवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात गंगाजल शिंपडा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडा लाल गुलाल टाका. यामुळे घरातील क्लेश थांबून पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.
advertisement
7/7
पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य: प्रेमसंबंधात स्थिरता आणण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीला आणि विष्णू देवाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. हा प्रसाद जोडीदारासोबत मिळून खाल्ल्याने नात्यात विलक्षण गोडवा निर्माण होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, लव्ह लाइफमध्ये पुन्हा येईल गोडवा, बिघडलेल्या नात्यात येईल प्रेमाची बहार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल