Who is Sayali Satghare : महाराष्ट्राची मराठमोळी स्टार! डेब्यू मॅचमध्ये कांगारूंना घाम फोडणारी सायली सातघरे आहे तरी कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND W vs AUS W, Sayali Satghare : सायली सातघरे हिने ऑस्ट्रेलियाच्या दोन मेन विकेट्स काढल्या असून गोर्जिया वोल आण अॅलिसा हेली या दोघींना सायलीने माघारी पाठवलं. सायलीने आत्तापर्यंत 11 ओव्हर केल्या असून फक्त 38 रन्स दिल्या.
advertisement
1/7

सध्या वुमेन्स क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यात सर्वात जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे डेब्यू स्टार सायली सातघरे...
advertisement
2/7
सायली सातघरे हिने ऑस्ट्रेलियाच्या दोन मेन विकेट्स काढल्या असून गोर्जिया वोल आण अॅलिसा हेली या दोघींना सायलीने माघारी पाठवलं. सायलीने आत्तापर्यंत 11 ओव्हर केल्या असून फक्त 38 रन्स दिल्या.
advertisement
3/7
मुंबईची 25 वर्षीय सायली सातघरे सध्या भारतीय महिला क्रिकेटमधील एक चर्चेतील नाव बनली आहे. मध्यमगती बॉलिंग आणि गरजेच्या वेळी उपयुक्त बॅटिंग करणारी सायली एक उत्तम ऑलराउंडर म्हणून ओळखली जाते.
advertisement
4/7
सायलीने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 2015 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं होतं. घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण परफॉर्मन्स दाखवल्यामुळे तिची भारतीय संघात वर्णी लागली असून गेल्या वर्षी तिने अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद शतक झळकावून लक्ष वेधलं होतं.
advertisement
5/7
सायलीच्या क्रिकेट प्रवासाला महिला प्रीमियर लीग (WPL) मुळे मोठी गती मिळाली. सुरुवातीला तिला कोणत्याही टीमने खरेदी केले नव्हतं, परंतु 2024 मध्ये गुजरात जायंट्सने तिला रिप्लेसमेंट म्हणून संधी दिली.
advertisement
6/7
2026 च्या सीझनमध्ये तिने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना 10 विकेट्स घेतल्या आणि टीमला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. तिच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मैदानावर विकेट घेतल्यानंतर सायली ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करते, त्याची तुलना सध्या चाहत्यांकडून विराट कोहलीशी केली जात आहे. तिचा आक्रमक अंदाज आणि जबरदस्त आत्मविश्वास पाहून क्रीडा विश्वात तिचे मोठे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Who is Sayali Satghare : महाराष्ट्राची मराठमोळी स्टार! डेब्यू मॅचमध्ये कांगारूंना घाम फोडणारी सायली सातघरे आहे तरी कोण?