IND vs SA : टीम इंडियाच्या हातून मॅच जाणार? 36 बॉल निकाल फिरवणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत विकेट काढत होता ते पाहता साऊथ आफ्रिका 100 धावात ऑल आऊट होईल असे वाटत होते. पण पॉवरप्लेनंतर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविसने गेम फिरवला होता.
advertisement
1/8

टी20 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.या सामन्यात साऊथ आफ्रिकेने बाजी मारली.
advertisement
2/8
खरं तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये साऊथ आफ्रिकेला धक्के द्यायला सूरूवात केली होती.
advertisement
3/8
सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने क्विंटन डिकॉकला क्लिन बोल्ड केले होते.त्यामुळे तो 6 वर बाद झाला.
advertisement
4/8
बुमराहनंतर अर्शदिपने एडन मार्करम कॅच आऊट केले होते.त्यामुळे तो 4 वर बाद झाला होता. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहने पुन्हा रायन रिकल्टनला कॅठ आऊट केले. अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेचे पॉवरप्लेच्या 4 ओव्हरमध्येच 20 धावांवर तीन विकेट पडले होते. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये आफ्रिकेने 3 विकेट गमावून 41 धावा दिल्या होत्या.
advertisement
5/8
ज्या प्रमाणे भारत विकेट काढत होता ते पाहता साऊथ आफ्रिका 100 धावात ऑल आऊट होईल असे वाटत होते. पण पॉवरप्लेनंतर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविसने गेम फिरवला होता.
advertisement
6/8
कारण दोघांनी मिळवून 7 ते 13 या सहा ओव्हरमध्ये 87 धावा काढल्या आणि एक विकेट गमावली होती. क्रिकेटमध्ये असे म्हणतात जो संघ 7 ते 13 या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करतो तो संघ हमखास सामना जिंकतो. त्यामुळे आता या सहा ओव्हर खरंच निकाल पाटलतात का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
advertisement
7/8
दरम्यान साऊथ आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने 45 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली होती.तिच्यासोबत डेविड मिलरने 35 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याने तीन षटकार आणि 7 चौकार मारले होते.
advertisement
8/8
त्यानंतर शेवटी स्टब्सने 24 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली होती.या बळावर साऊथ आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 धावा केल्या होत्या.त्यामुळे भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य आहे.