IND vs PAK मॅचमध्ये राडा फिक्स! उस्मान तारिकच्या बॉलिंगवर आर आश्विनने शोधला भन्नाट तोडगा, ओव्हरच पूर्ण करू शकणार नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravichandran Ashwin On Usman Tariq bowling action : टीम इंडियाचा माजी स्मार्ट बॉलर आर आश्विन याने उस्मान तारिक याच्या बॉलिंग अॅक्शनवरून टीम इंडियाला एक भन्नाट सल्ला दिला आहे.
advertisement
1/7

भारत आणि पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचा 4 ओव्हर भारी पडू शकतात. त्या ओव्हर म्हणजे पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक याची... उस्मान टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
advertisement
2/7
उस्मान तारिकच्या बॉलिंग अॅक्शनवर अनुभवी माजी भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला एक खास सल्ला दिला आहे. ज्यामुळे टीम इंडियाला मोठी मदत मिळू शकते.
advertisement
3/7
आर आश्विनचा हा सल्ला इतका प्रभावी आहे की, जर भारतीय फलंदाजांनी क्रिकेटच्या नियमांचा आधार घेतला, तर तारिकला गोलंदाजी करणं देखील कठीण होऊ शकते.
advertisement
4/7
उस्मान तारिकच्या गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा 'पॉज' किंवा थांबणं. तो बॉल टाकण्यापूर्वी अचानक काही सेकंद थांबतो, ज्यामुळे फलंदाजाची एकाग्रता आणि 'ट्रिगर मुव्हमेंट' पूर्णपणे बिघडतं.
advertisement
5/7
अश्विनच्या मते, हा प्रकार नियमांच्या चौकटीत असला तरी फलंदाजांकडेही याचे चोख उत्तर आहे. जर गोलंदाज बॉल टाकण्यापूर्वी थांबत असेल, तर फलंदाज देखील क्रीझ सोडून बाजूला होऊ शकतो आणि आपली तयारी नसल्याचं सांगू शकतो.
advertisement
6/7
अश्विनने स्पष्ट केले की, जर भारतीय फलंदाजांनी वारंवार अशी भूमिका घेतली, तर अंपायरवर प्रचंड दबाव येईल. यामुळे गोलंदाजाची लय बिघडू शकते आणि त्याला आपला नैसर्गिक अॅक्शन बदलण्यास भाग पाडले जाऊ शकते.
advertisement
7/7
जर आश्विन स्वतः या मॅचमध्ये खेळत असता, तर त्याने तारिकविरुद्ध ही ट्रिक नक्कीच वापरली असती. मात्र, भारतीय फलंदाज प्रत्यक्ष मैदानात ही खेळी खेळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK मॅचमध्ये राडा फिक्स! उस्मान तारिकच्या बॉलिंगवर आर आश्विनने शोधला भन्नाट तोडगा, ओव्हरच पूर्ण करू शकणार नाही!