TRENDING:

महाशिवत्रीला तब्बल 300 वर्षांनंतर बनतोय 'पॉवरफुल' योग, 'या' 3 राशींचे लोक होणार सुपर रिच!

Last Updated:
यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक सण नसून एक अभूतपूर्व खगोलीय घटना ठरणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, तब्बल 300 वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे, जिथे महाशिवरात्रीच्या दिवशी 12 शुभ योग आणि 4 मोठे राजयोग एकाच वेळी सक्रिय असणार आहेत.
advertisement
1/7
तब्बल 300 वर्षांनंतर बनतोय 'पॉवरफुल' योग, 'या' 3 राशींचे लोक होणार सुपर रिच!
यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक सण नसून एक अभूतपूर्व खगोलीय घटना ठरणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, तब्बल 300 वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे, जिथे महाशिवरात्रीच्या दिवशी 12 शुभ योग आणि 4 मोठे राजयोग एकाच वेळी सक्रिय असणार आहेत.
advertisement
2/7
या महाशिवरात्रीला कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्राची युती होत असून शनी स्वतःच्या राशीत विराजमान आहे. गुरु आणि चंद्राच्या स्थितीमुळे 'गजकेसरी योग' देखील तयार होत आहे.
advertisement
3/7
अशा प्रकारचा ग्रहांचा मेळ यापूर्वी 17 व्या शतकात पाहायला मिळाला होता. या योगांच्या प्रभावामुळे समाजात सकारात्मकता वाढेल आणि विशेषतः व्यापार व राजकारणात असलेल्या लोकांसाठी हा काळ 'वरदान' ठरेल.
advertisement
4/7
मेष - प्रगतीची नवी शिखरे: मेष राशीसाठी हा महासंयोग अत्यंत लाभदायी आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. महादेवाच्या कृपेने नोकरीत नवीन आणि मोठ्या संधी चालून येतील.
advertisement
5/7
सिंह - राजेशाही सुख सोयी: सिंहेचा स्वामी सूर्य आहे आणि तो या काळात शुभ योगात असेल. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. तुमचे नेतृत्व कौशल्य उजळून निघेल.
advertisement
6/7
मकर - साडेसातीतून मोठा दिलासा: मकर राशीवर शनीची साडेसाती सुरू असली तरी, 4 राजयोगांमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
advertisement
7/7
12 शुभ योगांचा प्रभाव: या दिवशी सिद्धी, शुभ, आणि शिव योगासह एकूण 12 योग असल्याने, शिवभक्तांनी केलेली कोणतीही साधना किंवा नवीन कामाची सुरुवात ही 100 टक्के यशस्वी ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
महाशिवत्रीला तब्बल 300 वर्षांनंतर बनतोय 'पॉवरफुल' योग, 'या' 3 राशींचे लोक होणार सुपर रिच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल