शेअर मार्केटच नाही... IPL चे 7 दिग्गजही पडले, पहिल्याच आठवड्यात 111 कोटी पाण्यात गेले?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम सुरू होऊन एक आठवड्यापेक्षा जास्तचा वेळ झाला आहे. सर्व 10 टीमच्या किमान 2 मॅच झालेल्या असून पॉईंट्स टेबलमध्येही मोठे उलटफेर होत आहेत.
advertisement
1/9

आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात आरसीबी आणि राजस्थानच्या टीमने धमाका केला असून दोन्ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक रनची ऑरेंज कॅप ही 22 वर्षांच्या समीर रिझवी याच्याकडे आहे.
advertisement
2/9
यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडू रातोरात स्टार झाले आहेत, पण लिलावात पाण्यासारखा पैसा ओतलेले दिग्गज खेळाडू मात्र एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करत आहेत. आयपीएल लिलावात 111 कोटी रुपये खर्च केलेले 7 खेळाडू सपशेल अपयशी ठरत आहेत.
advertisement
3/9
टी-20 वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ 3 अर्धशतकं करणाऱ्या संजू सॅमसनची बॅट आयपीएलच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये शांत आहे. सीएसकेकडून खेळताना संजूने 3 इनिंगमध्ये 6,7 आणि 9 रन केले आहेत. या मोसमात संजूला आतापर्यंत फक्त 22 रन करता आल्या आहेत. संजूला सीएसकेने 18 कोटींना टीममध्ये आणलं.
advertisement
4/9
संजूप्रमाणेच सीएसकेचा दुसरा ओपनर आणि टीमचा कर्णधार ऋतुराज गायकवाडही संघर्ष करत आहे. ऋतुराजने 3 इनिंगमध्ये फक्त 31 रन केले आहेत. ऋतुराज आणि संजूच्या कामगिरीमुळे सीएसकेने त्यांच्या तिन्ही मॅच गमावल्या. ऋतुराजला सीएसकेने 18 कोटी रुपयांना रिटेन केलं.
advertisement
5/9
कॅमरून ग्रीनला केकेआरने तब्बल 25.2 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण इतकी रक्कम देऊनही ग्रीन मोसमातला सगळ्यात अपयशी खेळाडू आहे. 3 सामन्यांमध्ये ग्रीनने फक्त 24 रन केल्या आहेत.
advertisement
6/9
दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला यंदा ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला, पण 2 इनिंगमध्ये त्याचा स्कोअर 0 आणि 1 रन आहे. राहुलला दिल्लीने 14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. राहुल फॉर्ममध्ये नसला तरी दिल्लीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
advertisement
7/9
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर निकोलस पूरनला लखनऊने 21 कोटी रुपयांना रिटेन केलं. मागच्या मोसमात पूरनने 196.25 च्या स्ट्राईक रेटने 524 रन केले, पण यंदा 2 सामन्यांमध्ये त्याला फक्त 9 रन करता आल्या आहेत.
advertisement
8/9
आयपीएल लिलावामध्ये लियाम लिव्हिंगस्टोनला हैदराबादने 13 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत नाहीये. आयपीएलच्या या मोसमात लिव्हिंगस्टोनने फक्त एक मॅच खेळली ज्यात त्याने फक्त 70 च्या स्ट्राईक रेटने 14 रन केल्या.
advertisement
9/9
गुजरातने न्यूझीलंडचा ऑलराऊंडर ग्लेन फिलिप्ससाठी 2 कोटी मोजले, पण 2 सामन्यांमध्ये फिलिप्सने फक्त 28 रन केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
शेअर मार्केटच नाही... IPL चे 7 दिग्गजही पडले, पहिल्याच आठवड्यात 111 कोटी पाण्यात गेले?