Mumbai Indians : दोन वर्ल्ड कपचे 2 चॅम्पियन कॅप्टन बेंचवर; मुंबई इंडियन्सचे एका मागोमाग एक शॉकिंग निर्णय!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना केकेआरविरुद्ध खेळत आहे. मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे.
advertisement
1/6

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टॉसनंतर जेव्हा प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
2/6
या सामन्यात मुंबई इंडियन्स 6 बॉलर आणि 5 बॅट्समन घेऊन मैदानात उतरली आहे. तसंच प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली नाही. 21 दिवसांपूर्वीच सूर्यकुमार यादवने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता.
advertisement
3/6
टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सने या सामन्यात इम्पॅक्ट सब म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली नाही. मुंबईची दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग सुरू होईल तेव्हा सूर्या मैदानात उतरेल.
advertisement
4/6
आयपीएलच्या मागच्या मोसमातही मुंबई इंडियन्सने भारताचा टी-20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा याला इम्पॅक्ट सब म्हणून वापरलं होतं. रोहितसारख्या अनुभवी खेळाडूची हार्दिकला मैदानात मदत होईल, तरी त्याला इम्पॅक्ट सब म्हणून वापरलं गेलं, ज्यावरून बरीच टीका झाली होती.
advertisement
5/6
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मागच्या मोसमात रोहित शर्माला दुखापत होती, त्यामुळे तो फिल्डिंग करू शकला नाही. या मोसमात मात्र रोहित इम्पॅक्ट सब म्हणून खेळणार नाही, असं जयवर्धने म्हणाले.
advertisement
6/6
मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोनच खेळाडू बॉलिंग करत नाहीत, त्यामुळे या दोघांपैकी फक्त एकालाच आम्ही इम्पॅक्ट सब म्हणून खेळवू शकतो, असंही जयवर्धने म्हणाले, तेव्हाच यंदाच्या मोसमात सूर्याला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवलं जाईल, हे जवळपास स्पष्ट झालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : दोन वर्ल्ड कपचे 2 चॅम्पियन कॅप्टन बेंचवर; मुंबई इंडियन्सचे एका मागोमाग एक शॉकिंग निर्णय!