TRENDING:

MS Dhoni : 'चेन्नईच्या टीममधून धोनीचा पत्ता कट', प्लेइंग इलेव्हन सोडा... इम्पॅक्ट सबमध्येही जागा नाही!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेचा एमएस धोनी हा सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
1/7
'चेन्नईच्या टीममधून धोनीचा पत्ता कट', प्लेइंग इलेव्हन सोडा... इम्पॅक्ट सबमध्येही जागा नाही!
टीम इंडिया आणि सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी हा 44 वर्षांचा आहे, त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये सर्व सामन्यांमध्ये खेळेल का नाही? याबाबतही साशंकता आहे.
advertisement
2/7
ऋतुराज गायकवाड हा यंदा सीएसकेचा कर्णधार आहे, तसंच सीएसकेने ट्रेड डीलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनलाही टीममध्ये आणलं, त्यामुळे संजू विकेट कीपिंगसोबतच ओपनिंगला बॅटिंगही करेल. संजूने विकेट कीपिंग केली तर धोनीची सीएसकेमध्ये भूमिका काय असणार? याबद्दल सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सीएसकेची प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट सब खेळाडूंचं नाव सांगितलं आहे. इरफानने त्याच्या या टीममध्ये धोनीला स्थान दिलेलं नाही.
advertisement
4/7
पठाणच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू आणि आयुष म्हात्रे ओपनिंगला खेळतील, तर तिसऱ्या नंबरवर कर्णधार ऋतुराज गायकवाड, चौथ्या क्रमांकावर शिवम दुबे आणि पाचव्या क्रमांकावर डेवाल्ड ब्रेविस आहेत.
advertisement
5/7
सहाव्या क्रमांकावर धोनीने सरफराज खानला निवडलं आहे. मागच्या 2 मोसमांमध्ये धोनी फक्त शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करायला यायचा, चाहत्यांसाठी हे चांगलं आहे, पण टीमसाठी योग्य नाही. धोनीला कमीत कमी 4 ओव्हर खेळल्या पाहिजेत, असं पठाण म्हणाला.
advertisement
6/7
प्रत्येक महान खेळाडूची वेळ येते जेव्हा त्याला खेळणं सोडावं लागतं. धोनीला आता सीएसकेची टीम बनवण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं वक्तव्य पठाणने केलं आहे.
advertisement
7/7
पठाणने सीएसकेच्या टीममध्ये सातव्या क्रमांकावर कार्तिक शर्मा आणि आठव्या क्रमांकावर प्रशांत वीरला निवडलं आहे. बॉलिंगमध्ये अकील हुसैन आणि नुर अहमद हे दोन स्पेशलिस्ट स्पिनर तर फास्ट बॉलिंगमध्ये मॅट हेन्रीची निवड पठाणने केली. इम्पॅक्ट सब म्हणून पठाणने खलील अहमदला स्थान दिलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MS Dhoni : 'चेन्नईच्या टीममधून धोनीचा पत्ता कट', प्लेइंग इलेव्हन सोडा... इम्पॅक्ट सबमध्येही जागा नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल