TRENDING:

2 लिटर दूध, 10 अंडी, असा आहे कोल्हापूरच्या महिला पहेलवानचा डाएट

Last Updated:
महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याआधी अमृताला मागच्या वर्षी ज्या स्पर्धकाकडून पराजित व्हावे लागले होते, तिलाच चितपट करायचे होते. म्हणून त्यासाठी अमृता आणि तिचे प्रशिक्षक दादासो लव्हटे यांनी विशेष डाएट आणि सराव सुरू ठेवला.
advertisement
1/7
2 लिटर दूध, 10 अंडी, असा आहे कोल्हापूरच्या महिला पहेलवानचा डाएट
काही दिवसांपूर्वी दुसरी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023-24 या स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडल्या होत्या. यामध्ये <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरची</a> कन्या शिरोळची पैलवान अमृता पुजारी हिने दुसरी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे. 76 किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडीला चितपट करत अमृताने ही कामगिरी केली आहे.
advertisement
2/7
मात्र महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याआधी अमृताला मागच्या वर्षी ज्या स्पर्धकाकडून पराजित व्हावे लागले होते, तिलाच चितपट करायचे होते. म्हणून त्यासाठी अमृता आणि तिचे प्रशिक्षक दादासो लव्हटे यांनी विशेष डाएट आणि सराव सुरू ठेवला.
advertisement
3/7
गेली 3 ते 4 वर्षे अमृता ही मुरगडच्या लोकनेते सदाशिव मंडलिक आंतरराष्ट्रिय कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे. एन.आय.एस. कुस्ती कोच दादासो लव्हटे आणि वस्ताद सुखदेव येरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृता कुस्तीचे धडे घेत आहे.
advertisement
4/7
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी तयारी करताना अमृता पुजारीने वेगवेगळ्या टेक्निकची प्रॅक्टिस, रनिंग, वजन वाढवणे याकडे जास्त लक्ष दिले होते. त्याचबरोबर मागच्या वर्षीचे यावेळी असणारे प्रतिस्पर्धी यांचा परिपूर्ण अभ्यास करत सराव सुरू ठेवला होता.
advertisement
5/7
मागच्या वर्षी तिचे वजन कमी भरले होते मात्र यंदा सहा ते सात किलो वजन वाढवून 76 किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यापर्यंत अमृताने मजल मारली होती. वजन वाढीसाठी दादासो लवटे यांनी अमृताच्या डायट मध्ये काही गोष्टी बदलल्या होत्या.
advertisement
6/7
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अमृताच्या आहारात रोजच्या जेवणात तुपाचे आणि दुधाचे प्रमाण जास्त असते. तीला साधारण दीड ते दोन लिटर दूध रोज प्यावे लागते. तर रोज किमान अर्धा डझन केळी आणि 8 ते 10 अंडी घ्यायला लागतात. या व्यतिरिक्त अमृताच्या आहारात असणाऱ्या चिकन, मटण, फळे यांचे प्रमाणही जास्त असते.
advertisement
7/7
तर महाराष्ट्र केसरीची तयारी करताना सुरुवातीचे काही महिने फक्त वजन वाढीवर भर देऊन नंतर फिटनेसकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या सर्व प्रयत्नांमुळे अमृताने शिरोळच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
2 लिटर दूध, 10 अंडी, असा आहे कोल्हापूरच्या महिला पहेलवानचा डाएट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल