TRENDING:

वडिल भाजपचे खासदार, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असूनही कृष्णराज महाडिक यांनी तडका फडकी का घेतली माघार?

Last Updated:
कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतून पक्षाच्या आदेशामुळे माघार घेतली. या निर्णयामुळे भाजपमध्ये चर्चा आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
advertisement
1/7
लाखो फॉलोअर्स असूनही कृष्णराज महाडिक यांनी तडका फडकी का घेतली माघार?
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, युवा पिढीमध्ये प्रचंड क्रेझ आणि घरात खासदार-आमदारांचा वारसा असतानाही चक्क धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी आयत्यावेळी माघार घेतल्याची घोषणा केली.
advertisement
2/7
त्यांनी अचानक घेतलेली ही माघार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून त्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अचानक त्यांनी आपला निर्णय बदलला.
advertisement
3/7
माघार घेतल्याचा खुलासा करताना कृष्णराज महाडिक यांनी पक्षाचा आदेश असल्याचं कारण दिलं आहे. भाजप ही एक शिस्तबद्ध संघटना असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या निर्णयाचा मी आदर करतो," असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरात महायुती म्हणून निवडणूक लढवताना जागावाटपाचा पेच निर्माण होऊ नये, यासाठी पक्षाने त्यांना माघार घेण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
advertisement
4/7
कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपमधील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते इच्छुक होते.
advertisement
5/7
खासदारांच्या मुलाला थेट उमेदवारी मिळाल्याने पक्षात गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी आणि संघर्षाचा विषय टाळण्यासाठी महाडिक कुटुंबाने माघार घेणे पसंत केल्याचे बोलले जाते.
advertisement
6/7
विशेष म्हणजे, कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र तेव्हाही त्यांनी माघार घेतली होती. वारंवार होणाऱ्या या माघारीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, समाजकारणात मी नेहमीच सक्रिय राहीन आणि कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत राहीन, अशी ग्वाही कृष्णराज यांनी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
advertisement
7/7
या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे असंही कृष्णराज महाडिक सांगायला विसरले नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
वडिल भाजपचे खासदार, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असूनही कृष्णराज महाडिक यांनी तडका फडकी का घेतली माघार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल