TRENDING:

Lionel Messi In india : तब्बल 14 वर्षानंतर मेस्सीची भारतात एन्ट्री! एअरपोर्टवर रात्री 1:30 वाजता काय काय घडलं?

Last Updated:
Lionel Messi In india : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तब्ब्ल 14 वर्षानंतर भारतात परतला आहे. भारतात फुटबॉल चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यात मेस्सी म्हटल्यावर फुटबॉल प्रेमींचा जीव की प्राण...
advertisement
1/7
मेस्सीची भारतात एन्ट्री! एअरपोर्टवर रात्री 1:30 वाजता काय काय घडलं?
तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या लिओनेल मेस्सी आता तीन दिवस भारतातच असणार आहे. मेस्सी 15 डिसेंबरपर्यंत तीन दिवसांत चार शहरांना भेट देईल. यामध्ये हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली यांचा समावेश आहे.
advertisement
2/7
काल रात्री उशिरा 1:30 वाजता मेस्सी आपल्या प्रायवेट वेटमधून कोलकाता एअरपोर्टवर उतरला. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी अनेक अधिकारी उपस्थित होते.
advertisement
3/7
मेस्सी येतोय म्हटल्यावर कोलकाता एअरपोर्टवर पैसे देऊन फॅन्सने एन्ट्री मिळवली अन् मेस्सीला एकदा डोळ्या देखत पाहण्यासाठी एकच झुंबड उडवली. हे पाहून मेस्सी देखील शॉक झाला.
advertisement
4/7
भारतातील फॅन्सची क्रेझ पाहून मेस्सीला देखील डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यानंतर तो हॉटेलमध्ये रवाना झाला. तर त्याचे फॅन्स त्याच्या गाडीमागे धावत असल्याचं दिसून आलं.
advertisement
5/7
आता आज सकाळी 9:30 वाजता चाहत्यांना भेटेल. कोलकाता येथे तो शाहरूख खान, ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली यांना भेटणार आहे. त्यानंतर तो वर्च्युल पद्धतीने मुर्तीचं अनावर केलं.
advertisement
6/7
त्यानंतर मेस्सी युवा भारती स्टेडियमवर पोहोचेल. तिथं तो शाहरूख खानची भेट घेईल. दुपारी 12:30 वाजता तो एक मैत्रीपूर्ण सामना खेळतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता हैदराबादला रवाना होईल.
advertisement
7/7
दरम्यान, 14 डिसेंबर रोजी तो मुंबईत पोहोचेल, जिथे तो वानखेडे स्टेडियमवर भारतीय दिग्गज सुनील छेत्रीविरुद्ध आणखी एक मैत्रीपूर्ण सामना खेळेल. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी तो दिल्ली पंतप्रधान मोदींची भेट घेईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Lionel Messi In india : तब्बल 14 वर्षानंतर मेस्सीची भारतात एन्ट्री! एअरपोर्टवर रात्री 1:30 वाजता काय काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल