Aajache Rashibhavishya: शनिवारी तुमच्या नशिबी काय? पैसा, प्रेम, प्रतिष्ठा की संकट, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Daily Horoscope: आजचा शनिवारी काही राशींसाठी खास असेल तर काहींसाठी आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या नशिबात काय? हे आजचं राशीभविष्य नाशिकचे ज्योतिषी समीर जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशी - तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. प्रवासात आज कुणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकतो. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभही होऊ शकतो. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. आजच्या दिवशी सर्वजण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. प्रवासाच्या संधी शोधाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आज तुमचा शुभ अंक 1 आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनःशांती गमावून बसाल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणारा आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर, त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरु करणार आहात. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकता. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 5 आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: शनिवारी तुमच्या नशिबी काय? पैसा, प्रेम, प्रतिष्ठा की संकट, आजचं राशीभविष्य