रोहितसोबत खेळणाऱ्याचा भीषण अपघात, मैदानातून स्ट्रेचरने थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत मुंबईच्या एका खेळाडूला मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/7

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत मुंबईच्या एका खेळाडूला मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे हा अपघात छोटा मोठा नव्हता. कारण मैदानात स्ट्रेचर बोलवावी लागली होती, त्यानंतर या खेळाडूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
3/7
दरम्यान हा खेळाडू नेमका कोण होता? आणि त्याला काय दुखापत झाली होती, हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
हा खेळाडू रोहित शर्माचा मुंबईचा साथीदार अंगक्रिश रघुवंशी आहे. उत्तराखंड विरूद्धच्या सामन्यात फिल्डींग करताना अंगक्रिश रघुवंशी गंभीर जखमी झाला होता.
advertisement
5/7
विशेष म्हणजे अंगक्रिश रघुवंशीला मानही वाकवता आली नाही.त्यामुळे परिस्थितीची गंभीरता पाहता मैदानावर एक स्ट्रेचर बोलावण्यात आली होती. या स्ट्रेचरवरून त्याला मैदानाबाहेर नेत जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
6/7
मिडिया रिपोर्टनुसार, अंगक्रिश रघुवंशीने कॅच घेण्यासाठी डाईव्ह मारली होता. या डाईव्हमुळे त्याच्या मानेला दुखापत झाली होती.त्यामुळे तो मान वाकवू शकला नाही आणि नंतर त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले होते.
advertisement
7/7
आता हॉस्पिटलमध्ये त्याचा सीटी स्कॅन केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रोहितसोबत खेळणाऱ्याचा भीषण अपघात, मैदानातून स्ट्रेचरने थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, नेमकं काय घडलं?