T20 World Cup : पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार? सर्वात मोठी ताकदच घात करणार, लाहोरच तिकीट कन्फर्म
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचा न्यूझीलंड विरूद्धचा सामना हा आर प्रेमदासा स्टेडिअवर रंगणार आहे.तर उरलेले इंग्लंड आणि श्रीलंका विरूद्धचे दोन सामने हे श्रीलंकेच्या पल्लीकेले मैदानावर रंगणार आहे. या पिचवर पाकिस्तान पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सामना खेळणार आहे.
advertisement
1/9

टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये नामिबियाचा पराभव करून पाकिस्तान सूपर 8 मध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानच्या सूपर 8 सामन्यांना शनिवार पासून सूरूवात होणार आहे.
advertisement
2/9
सुपर 8 च्या दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानसोबत न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन संघ आहे. या तीन संघापैकी पाकिस्तानचा न्यूझीलंड विरूद्धचा सामना हा आर प्रेमदासा स्टेडिअवर रंगणार आहे.
advertisement
3/9
तर उरलेले इंग्लंड आणि श्रीलंका विरूद्धचे दोन सामने हे श्रीलंकेच्या पल्लीकेले मैदानावर रंगणार आहे. या पिचवर पाकिस्तान पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सामना खेळणार आहे.
advertisement
4/9
पल्लीकेले मैदानावर सपाट पिच आहे. हे पिच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. पण पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची अवस्था पाहता पाकिस्तानसाठी खूप अवघड होणार आहे.
advertisement
5/9
पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये सहा स्पिनर आणि एक फास्टर बॉलर या रणनितीने मैदानात उतरत आली आहे. त्यातल्या त्यात त्याचा अनुभवी शाहिन आफ्रीदी विकेट काढण्यात अपयशी ठरतोच आहे, त्यासोबत धावा प्रचंड लूटतो आहे. भारता विरूद्धच्या या खराब कामगिरिमुळे त्याला नामिबिया विरूद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
advertisement
6/9
शाहिन आफ्रिदीचे वर्ल्ड कपमधील आकडे बघायला गेले तर त्याने नेदरलँड विरूद्ध 3 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन एक विकेट काढली होती.तर सलमान मिर्झाने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 3 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर युएसएने आफ्रीदीची धुलाई केली होती.त्याला 4 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. तर एक विकेट मिळाली होती.भारताविरूद्ध शाहिनला 2 ओव्हरमध्ये 31 धावा ठोकल्या होत्या. त्यात त्याने एक विकेट काढली होती.
advertisement
7/9
भारताविरूद्ध खराब कामगिरी केल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं आणि फहिम अश्रमला नामिबियाविरूद्ध संधी देण्यात आली होती. त्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या होत्या. पाकिस्तानकडे नसिम खानसारखा गोलंदाज आहे पण त्याला अद्याप संधी देण्यात आली नाही.
advertisement
8/9
एकंदरीत सूपर 8 च्या दोन सामन्यात पाकिस्तानला ज्या वेगवान गोलंदाजांची मदत हवी आहे ती मिळू शकणार नाही. त्यात पाकिस्तानची जी ताकद आहे स्पिनग गोलंदात ती त्या मैदानावर निकामी ठरणार आहे.
advertisement
9/9
पाकिस्तान आतापर्यंत मोहम्मद नवाज,अबरार अहमद, शादाब खान, मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीक, कॅप्टन सलमान आगा आणि सैम अयुब या सहा स्पिनरचा वर्ल्ड कपमध्ये वापर करत आली आहे.यातले काही गोलंदाज विकेट काढण्यात यशस्वी देखील ठरले आहे. पण पल्लीकेलेचे मैदान हे स्पिनर गोलंदाजांसाठी अनुकूल नसल्या कारणाने पाकिस्तानाचा सूपर 8 मध्ये घात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाकिस्तानच सूपर 8 मध्येच लाहोरच तिकीट कन्फर्म वाटतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार? सर्वात मोठी ताकदच घात करणार, लाहोरच तिकीट कन्फर्म