ज्याचं करिअर संपवायला PCB निघाली त्यानेच ठोकली डबल सेंच्युरी, सेहवागचा 19 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan Test captain Shan Masood double century : पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रेसिडेंट्स ट्रॉफीमध्ये शान मसुदने आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास रचला आहे. त्याने विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडून काढलाय.
advertisement
1/7

कराची येथे साहिर असोसिएट्स विरुद्ध खेळताना सुई नॉर्दर्न गॅस टीमकडून खेळणाऱ्या पाकिस्तानच्या टेस्ट कॅप्टनने पहिल्याच दिवशी धावांचा डोंगर उभा केला अन् टीमला विजय मिळवून दिलाय.
advertisement
2/7
त्याच्या या खेळीने केवळ त्याच्या टीमला मजबूत स्थितीत नेलं नाही, तर क्रिकेट विश्वातील दोन मोठ्या दिग्गजांचे जुने रेकॉर्ड्सही जमीनदोस्त केलं आहेत. पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन शान मसूद याने या मॅचमध्ये केवळ 177 बॉल्समध्ये आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली.
advertisement
3/7
यासह त्याने पाकिस्तानच्या धरतीवर फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा मान मिळवला आहे. मसूदने भारताचा माजी स्फोटक ओपनर वीरेंद्र सेहवाग याचा 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय.
advertisement
4/7
सेहवागने 2006 मध्ये लाहोर टेस्टमध्ये 182 बॉल्समध्ये डबल सेंच्युरी ठोकली होती, आता हा मान मसूदकडे गेला आहे.
advertisement
5/7
केवळ सहवागच नाही, तर मसूदने पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंजमाम-उल-हक याचा 33 वर्षे जुना रेकॉर्डही तोडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड शान मसुदचं करिअर खराब करण्यासाठी प्रयत्नात होती.
advertisement
6/7
इंजमामने 1992 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर 188 बॉल्समध्ये 200 रन्स केले होते. मसूदने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 212 रन्स केले असून त्यासाठी त्याने 185 बॉल्सचा सामना केला.
advertisement
7/7
दरम्यान, या खेळीमुळे मसूदच्या नावावर आता पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता पीसीबीवर टीका होताना दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ज्याचं करिअर संपवायला PCB निघाली त्यानेच ठोकली डबल सेंच्युरी, सेहवागचा 19 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला!