TRENDING:

पाकिस्तानच्या 'वादग्रस्त' बॉलरला अश्विनचा सपोर्ट, IND vs PAK मॅचआधीच भारतीय क्रिकेटरच्या विरोधात बोलला

Last Updated:
पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारीक यांच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरून पुन्हा मोठा वाद पेटला आहे. या वादात आता भारताची माजी स्पिरन गोलंदाज आर अश्विनने उडी टाकून मोठा वाद ओढवून घेतला आहे.
advertisement
1/7
पाकिस्तानच्या 'वादग्रस्त' बॉलरला अश्विनचा सपोर्ट,IND vs PAK मॅचआधीच भारतीय क्रिक
येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारीक आपल्या गोलंदाजी शैलीमुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या वादानंतर त्याच्या मदतीला भारताचा माजी स्पिनर गोलंदाज आर.अश्विन धावून आला आहे.
advertisement
2/7
त्याचं झालं असं की पाकिस्तानने मंगळवारी युएसचा 32 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात उस्मान तारीकने 3 विकेट घेऊन पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
3/7
पाकिस्तानच्या या विजयानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी उस्मान तारीकच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले होते. फुटबॉलमध्येही आता खेळाडूंना पेनल्टी रन-अप दरम्यान थांबण्याची परवानगी नाही. मग (तारिकची गोलंदाजी)ही कशी ठीक आहे? अ‍ॅक्शन -सर्व चांगले. पण थांबा? तेही लोडिंग करताना चेंडू टाकताना. हे गंभीरपणे चालू ठेवता येत नाही!,असे श्रीवत्स गोस्वामी यांनी म्हटले आहे.
advertisement
4/7
गोस्वामी यांच्या आक्षेपानंतर टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज आर अश्विनने उस्मान तारीकच्या गोलंदाजी अॅक्शनचं समर्थन करत त्यांना उत्तर दिलं होतं. माझी सहमती आहे फुटबॉल परवानगी देत ​​नाही. पण जर अंपायर किंवा गोलंदाजाला न कळवता फलंदाजाला हिट किंवा रिव्हर्स करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.मग गोलंदाजांना अंपायरला न सांगता ज्या हाताने गोलंदाजी करतो तो बदलण्याची परवानगी का नाही? असा सवाल करत पहिल्यांदा आयसीसी नियम बदलले पाहिजेत असे आवाहन आर. अश्विनने केले होते.
advertisement
5/7
विशेष म्हणजे आर अश्विनच्या या एक्स पोस्टवरून त्याने एकप्रकारे उस्मान तारीकच्या गोलंदाजीची पाठराखण केली. ही पाठराखण केल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती.या टीकेनंतर आर.अश्विनने आयसीसीच्या नियमांचा आधार घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
6/7
वाद पेटल्यानंतर स्पष्टीकरण देताना अश्विन म्हणाला, ठीक आहे,मी शक्य तितके स्पष्ट करतो.प्रथम त्याच्या अ‍ॅक्शनची कायदेशीररीत्या फक्त आयसीसीच्या बॉलिंग अ‍ॅक्शन चाचणी केंद्रातच तपासली जाऊ शकते.दुसरे म्हणजे, 15° चा नियम आहे ज्यानुसार गोलंदाजाला त्याचा कोपर सरळ ठेवावा लागतो आणि गोलंदाज 15° च्या आत गोलंदाजी करत आहे की नाही हे मैदानावरील पंचांकडून ठरवणे अशक्य आहे.त्यावर एकमेव उपाय म्हणजे स्पर्धा चाचणी साधनाचा वापर करणे.
advertisement
7/7
वरील गोष्ट एक राखाडी क्षेत्र आहे आणि एखाद्यावर राखाडी क्षेत्राचा वापर केल्याचा आरोप करणे चुकीचे आहे.शेवटी, क्रीजवरील विराम कायदेशीर आहे की नाही, आणि तिथेच माझा विश्वास आहे की ते पूर्णपणे कायदेशीर आहे कारण ती त्याची नियमित कृती आहे, असे म्हणत त्याने शेवटीही पाकिस्तानी गोलंदाजाच्या गोलंदाजीला सपोर्टच केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
पाकिस्तानच्या 'वादग्रस्त' बॉलरला अश्विनचा सपोर्ट, IND vs PAK मॅचआधीच भारतीय क्रिकेटरच्या विरोधात बोलला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल