IND vs SA : मॅच फिरली असती, पण गंभीरची एक चूक महागात पडली, 'हिटर'ला डगआऊटमध्ये बसवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान हा सामना टीम इंडिया सहज जिंकू शकली असती. पण टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरच्या हातून झालेली एक चूक टीम इंडियाला महागात पडली.
advertisement
1/8

साऊथ आफ्रिकेने टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला आहे. आफ्रिकेच्या या विजयाने टीम इंडियाच फायनल पोहोचण्याच गणित बिघडलं आहे.
advertisement
2/8
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 76 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/8
दरम्यान हा सामना टीम इंडिया सहज जिंकू शकली असती. पण टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरच्या हातून झालेली एक चूक टीम इंडियाला महागात पडली.
advertisement
4/8
खरं तर 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईशान किशन शुन्यावर बाद झाला होता.त्याच्या पाठोपाठ तिलक वर्मा देखील 1 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर अभिषेक शर्मा 15 धावांवर बाद झाला होता.त्यामुळे पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची अवस्था 29 धावांवर 3 विकेट अशी झाली होती.
advertisement
5/8
अभिषेक बाद झाल्यानंतर मैदानात आधीच सूर्या होता.त्यामुळे गौतम गभीरने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनसाठी वॉशिंग्टन सुंदरला वर पाठवले होते. पण त्याला खास कामगिरी करता आली नाही आणि तो 11 धावांवर बाद झाला.
advertisement
6/8
त्यामुळे वॉशिंग्टनला वर पाठवून टीम इंडियाला काहीच फायदा झाला नाही.याउलट जर वॉशिंग्टनच्या जागी रिंकूला मैदानात पाठवलं असतं तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा असता. कारण रिंकुने अनेक सामने जिंकवले आहेत.त्याला प्रेशरमध्ये खेळायची सवय आहे.
advertisement
7/8
पण गंभीरने नेहमीप्रमाणे त्याच्यावर विश्वास न दाखवल्यामुळे मॅच फसली आहे. कारण अनेकदा रिंकूची संघाला गरज असते पण त्याला मैदानात पाठवले जात नाही आणि जेव्हा सामना पूर्ण हातातून सुटतो त्यावेळेस त्याला संधी दिली जाते आणि त्याचा काहीच फायदा होत नाही.
advertisement
8/8
कारण जर समजा रिंकूने एकाबाजूने हिंटींग केली असती आणि सूर्याने एका बाजूने डाव सावरला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : मॅच फिरली असती, पण गंभीरची एक चूक महागात पडली, 'हिटर'ला डगआऊटमध्ये बसवलं