T20 World Cup : एका पराभवानंतरही टीम इंडिया टॉपवर जाणार... कोणामुळे घडू शकतो चमत्कार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे. सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा 76 रननी पराभव झाला आहे, त्यामुळे भारताचं सेमी फायनलचं समीकरण बिघडलं आहे.
advertisement
1/7

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 18.5 ओव्हरमध्ये 111 रनवर ऑलआऊट झाला. या सामन्यात टीम इंडियाने पूर्ण 20 ओव्हर बॅटिंगही केली नाही आणि सामना 76 रननी गमावला, त्यामुळे भारताचा नेट रनरेट अत्यंत खराब झाला आहे.
advertisement
2/7
सुपर-8 च्या पहिल्या सामन्यातल्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट हा मायनस 3.800 झाला आहे, त्यामुळे सेमी फायनलचं स्वप्न बघणाऱ्या टीम इंडियाचा हा मायनस नेट रनरेट घात करू शकतो.
advertisement
3/7
सुपर-8 मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकणारी टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल, तर 3 पैकी 2 सामने जिंकणाऱ्या टीमला दुसऱ्या 2 टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
4/7
सुपर-8 मध्ये टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या टीम आहेत. भारताचे उरलेले सामने 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होतील. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला मोठा विजय मिळवावा लागेल, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल.
advertisement
5/7
या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला तरी भारतीय टीमचं सेमी फायनलला पोहोचणं झिम्बाब्वेवर अवलंबून असेल. ग्रुप स्टेजप्रमाणेच झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला तर टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या शक्यता वाढतील.
advertisement
6/7
दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवला आणि झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजचा पराभव केला तसंच भारतानेही वेस्ट इंडिज, झिम्बाब्वेला धूळ चारली तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
advertisement
7/7
दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा नेट रनरेट हा प्लस 3.800 आहे, त्यामुळे आता एक सामन्यात विजय झाला तरी दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनलचा प्रवेश निश्चित होईल. भारताचं भवितव्य मात्र वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्या सामन्यावर अवलंबून असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : एका पराभवानंतरही टीम इंडिया टॉपवर जाणार... कोणामुळे घडू शकतो चमत्कार?