TRENDING:

IND vs SA : टीम इंडिया हारली, पण पाकिस्तानचही काही खरं नाही, सेमी फायनलचा प्रवास कुणाला अवघड जाणार? वाचा समीकरण

Last Updated:
सूपर 8 मध्ये प्रत्येक संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहेत. टीम इंडियाने त्यांचा पहिला सामना गमावला आहे.आता टीम इंडियाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे.
advertisement
1/10
टीम इंडिया हारली, पण पाकिस्तानचही काही खरं नाही, सेमी फायनलचा प्रवास कुणाला अवघड
टी20 वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 76 धावांनी जिंकला आहे.
advertisement
2/10
साऊथ आफ्रिकेने या विजयासह सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये आघाडी घेतली आहे. आफ्रिका आता एका सामन्यात 2 गुणांसह +3.800 नेट रनरेटने पहिल्या स्थानी आहे.
advertisement
3/10
तर पराभवानंतर टीम इंडिया सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये चौथ्या स्थानी फेकली गेली आहे. टीम इंडियाचा नेट रनरेट -3.800 आहे.
advertisement
4/10
सूपर 8 मध्ये प्रत्येक संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहेत. टीम इंडियाने त्यांचा पहिला सामना गमावला आहे.आता टीम इंडियाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे.
advertisement
5/10
टीम इंडियाचा पुढचा सामना आता झिम्बाबे विरूद्ध आहे.झिम्बाबेला हलक्यात घेण टीम इंडियाला महागात पडू शकत. कारण झिम्बाबेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना हरवलं आहे.पण असे जरी असले तरी टीम इंडियाला काही करून झिम्बाबेला हरवावे लागणार आहे.
advertisement
6/10
झिम्बाबेनंतर टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. वेस्ट इंडिज चांगली टीम आहे.टीम इंडियाला टफ फाईट देऊ शकते. पण टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यासाठी तिला हरवावे लागेल.
advertisement
7/10
ही झालं भारताच समीकरण पाकिस्ताबद्दल बोलायच झालं तर त्यांचा न्यूझीलंड विरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांना एक गुण मिळाला आहे. आता पाकिस्तान भारताप्रमाणे पुढचे दोन सामने जिंकणे गरजेचे असणार आहे.
advertisement
8/10
पाकिस्तानचा पहिला सामना जो रद्द झाला तो कोलबो आर प्रेमदासा स्टेडिअमवर होता.या सामन्यात पाकिस्तान हमखास जिंकली असती.पण पल्लीकेले मैदानावर आता पाकिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन संघ आहे. या संघाना हरवणे त्यांना अवघड जाणार आहे.
advertisement
9/10
कारण पल्लीकेले सपाट पिच आहे. हे पिच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. पण पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची अवस्था पाहता पाकिस्तानसाठी खूप अवघड होणार आहे.
advertisement
10/10
पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये सहा स्पिनर आणि एक फास्टर बॉलर या रणनितीने मैदानात उतरत आली आहे. त्यातल्या त्यात त्याचा अनुभवी शाहिन आफ्रीदी विकेट काढण्यात अपयशी ठरतोच आहे, त्यासोबत धावा प्रचंड लूटतो आहे. भारता विरूद्धच्या या खराब कामगिरिमुळे त्याला नामिबिया विरूद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान बाहेर होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडिया हारली, पण पाकिस्तानचही काही खरं नाही, सेमी फायनलचा प्रवास कुणाला अवघड जाणार? वाचा समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल