उद्या मंगळ बदलणार चाल! 'या' 3 राशींना बसणार 'डबल फटका', किती दिवस सहन करावे लागणार हाल?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी अखेरीस ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होत आहेत. उद्या, 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच मायावी ग्रह राहू ठाण मांडून बसला आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी अखेरीस ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होत आहेत. उद्या, 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच मायावी ग्रह राहू ठाण मांडून बसला आहे. मंगळ आणि राहू यांची ही युती ज्योतिषशास्त्रात अत्यंत उग्र आणि विनाशकारी मानला जाणारा 'अंगारक योग' निर्माण करत आहे.
advertisement
2/7
हा योग 2 एप्रिल 2026 पर्यंत राहील. या काळात शनीच्या राशीत मंगळ आणि राहू एकत्र असल्याने तीन राशींच्या जातकांना 'डबल फटका' सहन करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव अशा दोन्ही आघाड्यांवर या राशींची परीक्षा घेतली जाईल.
advertisement
3/7
अंगारक योग म्हणजे अग्नी आणि वारा यांचे मिश्रण. मंगळ अग्नीचा कारक आहे, तर राहू वायू तत्त्वाचा. जेव्हा हे दोन ग्रह शनीच्या राशीत एकत्र येतात, तेव्हा लोकांमध्ये अवाजवी धाडस, राग आणि चुकीचे निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढते.
advertisement
4/7
17 फेब्रुवारीच्या सूर्यग्रहणानंतर निर्माण झालेली ही स्थिती 2 एप्रिलपर्यंत सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर वादळ निर्माण करू शकते. या काळात शत्रू सक्रिय होतात आणि अपघाताच्या शक्यताही बळावतात.
advertisement
5/7
मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो राहूच्या विळख्यात सापडणार आहे. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होतील, ज्यामुळे तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. रागाच्या भरात कोणालाही अपशब्द वापरू नका. आरोग्याच्या बाबतीत रक्ताशी संबंधित किंवा उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहा.
advertisement
6/7
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी ही युती पाचव्या भावात होत आहे. गुंतवणुकीत मोठी जोखीम पत्करू नका, अन्यथा तुमचे भांडवल बुडू शकते. मुलांच्या वागण्यामुळे किंवा त्यांच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. जोडीदारासोबत असलेल्या जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटू शकते, त्यामुळे संयम पाळावा.
advertisement
7/7
कुंभ: तुमच्याच राशीत मंगळ-राहूची युती होत आहे, जी सर्वात जास्त प्रभाव टाकणारी ठरेल. तुमची निर्णयक्षमता कमकुवत होईल आणि तुम्ही भ्रमात राहाल. स्वतःच्या अहंकारापोटी जवळच्या व्यक्तींना दुखावू नका. समाजात किंवा कार्यालयात मानहानी होण्याचे योग आहेत, त्यामुळे कोणत्याही गुप्त व्यवहारापासून दूर राहा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या मंगळ बदलणार चाल! 'या' 3 राशींना बसणार 'डबल फटका', किती दिवस सहन करावे लागणार हाल?