TRENDING:

Shaheen Afridi : शाहिन आफ्रिदी ऑस्ट्रेलिया सोडून पळाला, बेक्कार धुलाईनंतर तोंड लपवून पाकिस्तानमध्ये आला!

Last Updated:
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधून बाहेर पडला आहे. 4 सामन्यांमध्ये आफ्रिदीची बॅटरनी जबरदस्त धुलाई केली.
advertisement
1/7
शाहिन आफ्रिदी ऑस्ट्रेलिया सोडून पळाला, बेक्कार धुलाईनंतर पाकिस्तानमध्ये आला!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधून पळाला आहे. आपल्या पहिल्याच बीबीएल सिझनमध्ये आफ्रिदी ब्रिस्बेन हिटकडून 4 मॅच खेळला, या सामन्यांमध्ये त्याची धुलाई झाली. आता दुखापत झाल्यामुळे आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
advertisement
2/7
शाहिन आफ्रिदीला बिग बॅश लीग सोडून पाकिस्तानमध्ये परत जावं लागणार असल्याचं ब्रिस्बेन हिटने सांगितलं आहे. आफ्रिदीला ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती.
advertisement
3/7
'बीबीएल तशीच होती, जसं मी ऐकलं होतं. खूप चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालं. मला इथे खेळायला आवडलं. दुखापतीतून बरा होईपर्यंत मी टीमला पाठिंबा देईन, भविष्यात पुन्हा भेट होईल, अशी अपेक्षा आहे', असं शाहिन आफ्रिदी म्हणाला आहे.
advertisement
4/7
शाहिन आफ्रिदीने बिग बॅश लीगच्या आपल्या पहिल्याच मोसमात एकूण 4 मॅच खेळल्या, ज्यात त्याची जबरदस्त धुलाई झाली. पहिल्या सामन्यात आफ्रिदीने मेलबर्नविरुद्ध 2.4 ओव्हरमध्ये 43 रन दिले.
advertisement
5/7
यानंतर दुसऱ्या सामन्यात पर्थ स्क्रॉचर्सने आफ्रिदीच्या बॉलिंगवर 49 रन काढले, यात त्याला 1 विकेट मिळाली. सिडनीविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने 35 रन देऊन 1 विकेट घेतली. तर ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध आफ्रिदीने एकही विकेट न घेता 26 रन दिल्या.
advertisement
6/7
'आफ्रिदीचा सिझन त्याला पाहिजे तसा गेला नाही, पण तो पूर्णवेळ प्रोफेशनल क्रिकेटरसारखा वागला. ब्रिस्बेन हिटमध्ये त्याला संधी देऊन आम्हाला चांगलं वाटलं. युवा बॉलरना आफ्रिदीकडून खूप काही शिकायला मिळालं. तो लवकर फिट व्हावा, टी-20 वर्ल्ड कपसाठी आफ्रिदीला शुभेच्छा', असं ब्रिस्बेन हिटचे सीईओ टेरी स्वेन्सन म्हणाले.
advertisement
7/7
आफ्रिदी बिग बॅश लीगमधून बाहेर झाल्यामुळे आता ब्रिस्बेन हिट त्याच्या बदल्यात नवा खेळाडू शोधत आहे. दुसरीकडे आफ्रिदी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फिट व्हायची तयारी करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shaheen Afridi : शाहिन आफ्रिदी ऑस्ट्रेलिया सोडून पळाला, बेक्कार धुलाईनंतर तोंड लपवून पाकिस्तानमध्ये आला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल