TRENDING:

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी शुभमन गिलला विषबाधा, दोन मॅचमधून काढता पाय! आता कॅप्टन कोण?

Last Updated:
Shubman Gill Food Poisoning : टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल हा विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर झाला आहे. शुभमन गिल याला अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान झालं आहे.
advertisement
1/7
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी शुभमन गिलची अचानक प्रकती ढासळली
न्यूझीलंडविरुद्ध आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणार असतानाच आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कॅप्टनची अचानक प्रकृती ढेपाळल्याचं पहायला मिळालं.
advertisement
2/7
टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल हा विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर झाला आहे. शुभमन गिल याला अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे निदान झालं आहे.
advertisement
3/7
जयपूरच्या जयपूरिया विद्यालय मैदानावर 3 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमधील पंजाबच्या सामन्यात शुभमन खेळणार होता, मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला विश्रांती देण्यात आली.
advertisement
4/7
गिलला 3 आणि 6 जानेवारी रोजी अनुक्रमे सिक्कीम आणि गोवा विरुद्धच्या सामन्यांसाठी पंजाबच्या संघात सामील व्हायचे होते, परंतु अचानक झालेल्या त्रासामुळे त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला.
advertisement
5/7
वैद्यकीय टीमने दिलेल्या सल्ल्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. सुदैवाने, गिलची ही प्रकृती फारशी गंभीर नसून ती किरकोळ स्वरूपाची आहे. त्यामुळे आगामी महत्त्वाच्या मालिकांमधील त्याच्या उपलब्धतेबद्दल मोठा प्रश्न आहे.
advertisement
6/7
वैद्यकीय कर्मचारी शुभमन गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असून, तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात बॅटिंग करताना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, शुभमन गिलची प्रकृती खरंच खराब झालीये की दुखापतीतून वाचण्यासाठी नवा फंडा आहे? असा सवाल क्रिकेटचे फॅन्स विचारत आहेत. तर प्रभसिमरन सिंग याच्याकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी शुभमन गिलला विषबाधा, दोन मॅचमधून काढता पाय! आता कॅप्टन कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल