Vaibhav Suryavanshi :फक्त 11 धावा करून वैभव सूर्यवंशीने 19 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला,नेमका विक्रम काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडियाने नवीन वर्षात पहिलाच विजय मिळवला आहे.भारताने या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा अवघ्या 25 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
1/8

वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडियाने नवीन वर्षात पहिलाच विजय मिळवला आहे.भारताने या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा अवघ्या 25 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
2/8
खरं तर या सामन्यात भारताने 301 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिका फक्त 27 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 148 धावा करू शकली होती.
advertisement
3/8
त्यानंतर या सामन्यात पावसाने घोळ घातल्याने हा सामना रद्द करण्यात आला. आणि डिएलएस मेथडनुसार भारताने हा सामना 25 धावांनी जिंकला होता.
advertisement
4/8
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. वैभव अवघ्या 11 धावा करून बाद झाला होता.त्यानंतर हरवांश पंगालियाच्या 93 आणि आरएस अम्ब्रीशच्या 65 धावांच्या बळावर भारताने 300 धावा केल्या होत्या.
advertisement
5/8
दरम्यान सामन्यात वैभव सूर्यंवंशीची बॅट चालली नाही तरी देखील 11 धावा करून मोठा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
6/8
2026 च्या पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक मोठी कामगिरी केली आणि पाकिस्तानी खेळाडूचा १९ वर्षे जुना विक्रम मोडला.
advertisement
7/8
वैभव सूर्यवंशी 14 वर्षे आणि 282 दिवसांचा असताना, तो आता युवा एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.हा विक्रम पाकिस्तानच्या अहमद शहजादने 19 वर्षी केला होता.
advertisement
8/8
वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय अंडर19 च्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 16 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi :फक्त 11 धावा करून वैभव सूर्यवंशीने 19 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला,नेमका विक्रम काय?